‘त्या’ व्हिडिओ प्रकरणाचे धागेदोरे बॉलिवूडपर्यंत? प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती रडारवर?

163

अभिनय क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या नवोदित तरुणींचे ‘व्हिडिओ’ तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटची व्याप्ती दिवसागणिक वाढत आहे. 

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आठव्या आरोपीला अटक केली असतानाच दुसरीकडे अशाच आणखी एका प्रकरणात मालवणी पोलिस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शान बॅनर्जी उर्फ दीपांकर असे अटक करण्यात आलेल्या आठव्या आरोपीचे नाव असून तो याआधी अटक केलेल्या रोवा खान हिचा पती आहे.

मालिका, वेब सिरीज तसेच चित्रपटांमध्ये भूमिका मिळवून देण्याचे अमिष दाखवून तरुणींचे अश्लील व्हिडिओ बनविणाऱ्या ‘प्रोडक्शन’ कंपनीचा गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने गेल्या आठवड्यात पर्दाफाश केला.

पोलिसांनी बंगल्यातून यासिन बेग खान उर्फ रोवा, प्रतिभा नलावडे, मोनू जोशी, भानुसुराम ठाकूर आणि मोहमद आसिफ या पाच जणांना अटक केली.

यासिन बेग ही निर्माता दिग्दर्शक असून त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री गहना वसिष्ठ हिचे नाव पुढे आले होते. या व्हिडीओ चित्रफीत परदेशात विकणाऱ्या उमेश कामत यालाही अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींचे आर्थिक व्यवहार तसेच इतर पुराव्यांवरून आणखी आरोपींची नवे समोर येत असून मंगळवारी रोवा हिचा पती शान याला अटक करण्यात आली.

प्रोडक्शन ‘कंपनी’ला अर्थपुरवठा बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीच्या कंपनीतून होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तिच्या पतीचीही या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे.

फसवणूक झालेल्या तरुणी तक्रार करण्यासाठी पुढे येत असून एका तरुणीने आपल्यासोबत असाच प्रकार घडल्याचे म्हटले आहे. तिने तिच्या तक्रारीमध्ये आरोपींची नावे वेगळी सांगितल्याने मालवणी पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहा लाख रुपये दे नाहीतर अश्लील व्हिडीओ जास्तीत जास्त व्हायरल केला जाईल अशी धमकी देखील या आरोपींनी दिल्याचा आरोप या तरुणीने तक्रारीत केला आहे.

गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींचे या प्रकरणातील आरोपींसोबत लागेबंध आहेत की ही अन्य ‘कंपनी’ आहे याचा तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here