Three Weeks Lockdown in Maharashtra | महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन अपरिहार्य : विजय वडेट्टीवार

673
राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन

राज्यात भविष्यात संपूर्णत: लॉकडाऊन करावाच लागणार आहे.

मुंबई : महाराष्ट्रात राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय आपण निरपराध लोकांचे प्राण वाचवू शकत नाही. कारण, राज्यात कोविडचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळेच, आज तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात विकेंड लॉकडाऊनऐवजी तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदीला सुरुवात होणार आहे. शनिवारी आणि रविवारी दोन दिवसांचा कडक बंद करण्यात येत आहे. मात्र, सद्यस्थितीत हा विकेंड लॉकडाऊन उपयोगाचा नसून 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करावाच लागेल, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

आगामी 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 10 लाखांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे.

त्यामुळे विरोधकांनी यावरुन राजकारण करु नये. गेल्या महिन्यात एमपीएससीची परीक्षा रद्द झाली तेव्हा भाजपचे नेते रस्त्यावर उतरले. आतादेखील भाजपकडून व्यापाऱ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावले जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

राज्यात भविष्यात संपूर्णत: लॉकडाऊन करावाच लागणार आहे. गर्दी टाळण्यासाठी रेल्वेवरही निर्बंध आणावे लागतील. कोरोनाची संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही कितीही उपाययोजना केल्या, तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे.

डॉक्टर कमी पडतील, नर्स कमी पडतील हे आणणार कुठून. जी व्यवस्था, आता साडे पाच हजार डॉक्टर अंतिम परीक्षा पास होतील, त्यांना आम्ही कामाला लावतो. पीजी वाल्या विद्यार्थ्यांचीही सेवा आम्ही घेणार आहोत.

आपल्याकडे यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळेच, विकेंडऐवजी कडक लॉकडाऊनची विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे आपत्ती व विजय वडेट्टीवार यांनी सांगितल.

पुढच्या दहा दिवसांत महाराष्ट्रात 10 लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची शक्यता

पुढच्या दहा दिवसांत महाराष्ट्रात 10 लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे विरोधकांनी यावर राजकारण न करता आम्हाला उपाय सुचवावेत.

सध्याच्या घडीला देशाच्या अनेक भागांमध्ये लॉकडाऊन आहे. गुजरातमध्येही अनेक जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन आहे. मात्र, भाजपचे नेते त्यावर काही बोलत नाहीत. फक्त महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला तर भाजपचे नेते टीका करायला सुरुवात करतात, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here