पुण्यातला थरार | लेडी डॉनने साथीदारांच्या मदतीने केली प्रियकराचीच हत्या, धारदार शस्त्राने केले वार

335
Drugs worth Rs 2 crore seized in Mumbai Son of biggest drug supplier arrested

पुण्यातील कुख्यात लेडी डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेनं तीन साथीदारांच्या मदतीनं प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे.

शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिघांना अटक केली आहे. शबनम हनिफ शेख असं या लेडी डॉनचं नाव असून तिनं तिचा प्रियकर सुमित जगताप याची हत्या केली.

शबनम ही स्वतःला लेडी डॉन म्हणवून घेते. ती, तिनं गाडीवरही तसे स्टिकर लावलेले होते. मनी लाँडरींग आणि इतर गुन्हेगारांना बेकायदेशीररित्या कर्ज वाटप करणे अशा गुन्ह्यांतही ती अडकलेली होती. शबनम शेख ही विवाहित होती, मात्र तरीही तिचे सुमित जगताप नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते.

सुमित जगताप याचीही पोलिस दरबारी गुन्हेगारी प्रकरणांत नोंद होती. शबनम ही पतीसोबत राहत असल्याचे सुमितला आवडत नव्हते. त्यावरून या दोघांचे अनेकदा वादही होत होते. सुमित यावरून शबनमला मारहाणही करत होता.

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री ही घटना घडली त्यावेळी शबनम आणि सुमित हे दारु पित होते. त्याचदरम्यान सुमीत आणि शबनम यांच्यात वाद झाला.

सुमितनं गोंधळ घालायला सुरुवात केली आणि नंतर त्यानं तिला मारहाणही सुरू केली. हा सर्व प्रकार पाहून त्याठिकाणी असलेल्या शबनमच्या तीन साथीदारांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण हा वाद अधिकच वाढत गेला.

त्यानंतर शबनमसह तिच्या तीन साथीदारांनी सुमितला मारहाण सुरू केली. हा प्रकार एवढा विकोपाला गेला की, या चौघांनी धारदार शस्त्राच्या सहाय्याने सुमितची हत्या केली.

या प्रकारानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. शबनम आणि सुमित यांच्यात जवळपास दीड वर्षापासून संबध होते. पण दारुच्या नशेत तो अनेकदा तिला मारहाण करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. पुणे मिररनं याबाबतचे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here