Tikri Rape Case | बीकेयू पीडितेच्या कुटूंबासोबत उभा आहे आणि दोषींवर कडक कारवाई करावी : राकेश टिकैत

151
Gang rape of a young girl by a doctor

नवी दिल्ली : शेतकरी केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी गेल्या 7 महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत.

दरम्यान, शेतकरी संघटना 26 जून रोजी देशभरात राजभवनाबाहेर निदर्शने करणार आहे. भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी टिकरी बलात्कार प्रकरणावर आपले मौन मोडले आहे. टिकैत म्हणाले की, बीकेयू पीडितेच्या कुटूंबासोबत उभा आहे आणि दोषींवर कडक कारवाई करावी ही मागणी करीत आहे.

“आम्ही पीडितेच्या वडिलांना भेटलो आहोत, आम्ही त्याला सांगितले आहे की संयुक्त मोर्चा त्याच्या पाठीशी आहे आणि त्याने मुलीने जे सांगितले आहे, त्या आधारे त्याने तक्रार दाखल करावी. आम्ही पिडीत मुलीला न्याय मिळावा यासाठी सर्व प्रकारची मदत करायला तयार आहोत”- टिकैत 

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, ज्याने हा भयंकर गुन्हा केला असेल त्याला कायद्यानुसार शिक्षा होईल. महिला स्वयंसेवकांच्या संरक्षणासाठी बीकेयू नेहमीच आग्रही रहात आली आहे. त्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही.

शेतकरी आंदोलना दरम्यान कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी आम्ही पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र बॅरिकेड्स लावले आहेत, अगदी शिबिरेही स्वतंत्र आहेत. वॉशरूम देखील पूर्णपणे स्वतंत्र ठेवले आहेत. आम्ही महिला व मुलींची अधिक बारकाईने काळजी घेत आहोत.

या प्रकारच्या निंदनीय घटना कोठेही घडू नयेत. कारण आमच्या आंदोलनात आलेल्या स्त्रिया माता भगिनी आहेत. जर एखादी स्त्री आम्हाला सांगते की तिला एक समस्या आहे, तर आम्ही त्याकडे तात्काळ लक्ष देतो. तिची अडचण सोडवून देतो, त्यासाठी शेकडो स्वयंसेवक लक्ष देऊन आहेत.

टिकरी प्रकरणानंतर आम्ही तपासणी अधिक कडक केली आहे. आंदोलक कुठून आला आहे, त्याचा उद्देश काय आहे? तो नेमका कशासाठी आलाय याची पूर्ण शहनिशा करीत आहोत.आम्ही तिथे काही पोलिसांना सांगितले आहे की जर तेथे काही संशयास्पद व्यक्ती किंवा घटना आढळल्यास, पोलिस त्यांना शोधून बाजूला काढू शकतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here