आजपासूनच 18 वर्षांवरील लसीकरण होणार सुरु; लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
आजपासून शाळांना उन्हाळी सुट्टी, 14 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.
● केंद्राने सर्व नागरिकांना मोफत लस द्यायला हवी! सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे बजावले.
● कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा येत्या 31 मे पर्यंत स्थगित
● राज्यातील 799 पोलिसांना पोलीस महासंचालक पदक; गुणवत्तापूर्ण सेवा, उल्लेखनीय कामगिरीची दखल
● रशियाची स्पुटनिक व्ही लस आज होणार भारतात दाखल; मे महिन्याअखेरीस मिळणार 50 लाख डोस
● गुजरातमधील कोव्हिड केअर सेंटरला भीषण आग, 12 जणांचा होरपळून मृत्यू
● पंजाबनं बंगळुरुवर 34 धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे.
● दुचाकी कंपनी यामाहा भारतात लॉन्च करणार नवी मोटरसायकल, 1 लाख किंमत असण्याची शक्यता
● केरळमध्ये हरवलेल्या मुलावर आधारित एक नवाकोरा हिंदी चित्रपट ‘बॅकवॉटर्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार
● राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 1 मे पासून सुट्ट्या जाहीर
● तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
● देशात सर्वात जास्त ऑक्सिजन महाराष्ट्राला, लॉजिकली डिस्ट्रिब्युशन व्हावं : फडणवीस
● “महाराष्ट्रात 1 मेपासून लसीकरण सुरू होऊ शकेल, ” राजेश टोपेंनी केले सूतोवाच!
● कोरोनाच्या संबंधात सोशल मीडियावरील पोस्टवर कोणतीही कारवाई करता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय
● कोरोना रुग्णांपैकी केवळ 15 टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज – WHO
● आता हवेतून ऑक्सिजन बनविणारी मशीन परदेशातून ऑनलाईन मागवता येणार, केंद्रसरकारचा मोठा निर्णय
● कोरोनाच्या दुसऱ्या भीषण लाटेदरम्यान मंत्रीमंडळाची बैठक, पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांना सूचना
● भारतीय चित्रपटसृष्टीचा तब्बल 8 हजार मिनिटांचा मौखिक इतिहास आता ऑनलाइन उपलब्ध
● लातूर जिल्ह्यात दिवसभरात ९५८ रुग्णांची भर; १४४६ कोरोनामुक्त
● उदगिरात आणखीन ६७ कोरोनाबाधित आढळले
● शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील पांढरवाडी ओढ्यावरील बाॅक्स सेल पुलाच्या बांधकामासाठी पाटबंधारे विभागाकडून दीड कोटी रुपये मंजूर
● नांदेड जिल्ह्याचा पॉझिव्हिटि रेटही राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक; नांदेडचा मागील आठवड्यातील पॉझिटिव्हिटि रेट २७.२१ टक्के एवढा राहिला आहे
● राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन व मदत आणि पुनर्वसन विभागाने नांदेड जिल्ह्यासाठी ५२ नव्या रुग्णवाहिका एसडीआरएफच्या माध्यमातून खरेदी केल्या आहेत
● नांदेड जिल्ह्यात रेशन दुकानदारांना ई पॉस मशीनवर अंगठा लावणे आवश्यक करण्यात येणार असल्याने कोरोना वाढण्याची भीती निर्माण झाली आहे
● चिंताजनक ! उस्मानाबाद जिल्ह्यात महिनाभरात आढळले १६ हजार ९१३ रुग्ण; महिन्यात ३०७ जणांचा बळी
● कळंब – तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या टप्यात होणाऱ्या रूग्णसंख्येतील वृद्धी कायम असून संख्या दोन हजारापार गेली आहे. असे असले तरी यात एक हजारावर रूग्ण कोरोनामुक्त झाले
● कळंब -कळंब शहर व ग्रामीण भागात मागील तीन दिवसापासून लसीकरण ठप्प झाले असून कधी कोविशिल्ड आहे तर कोवॅक्सिन नाही अन कोवॅक्सिन आहे तर कोविशिल्ड संपत असल्याने ‘लस नको पण चकरा आवरा’ अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.