TODAY LIVE UPDATE | दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा

222

आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ओबीसी 

आणि भटक्या-विमुक्तांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं. त्यासाठी आठ लाख उत्पन्नाची मर्यादा आहे.

यापूर्वी या उत्पन्नात शेती आणि नोकरीतून मिळणारे वेतन हे उत्पन्न म्हणून गृहीत धरलं जायचं पण यापुढे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देताना शेती आणि नोकरीतून मिळणारे वेतन उत्पन्न म्हणून गृहीत धरले जाणार नाही.

फक्त अन्य स्त्रोतापासून मिळणारे उत्पन्न गृहीत धरले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो नोकरदार, शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. तसे परिपत्रक आज राज्य सरकारने जारी केली आहे

यवतमाळ : 1 लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी 

घाटंजी येथील पोलीस निरीक्षक राजाभाऊ घोगरे ताब्यात, एसीबीची कारवाई, तक्रारदार यांचा फटाक्याच्या व्यवसाय असून त्यांचेवर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या विशेष पथकाची रेड थांबविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक घोगरे यांनी तक्रारदार यांना सहा लाख रुपयांची मागणी केल्याबाबत तक्रारदारांनी तक्रार दिली होती.
घोगरे यांनी तक्रारदार यांना तडजोडीअंती एक लक्ष रुपये लाच रक्कम पोलीस अधीक्षक यांच्या स्कॉडसाठी मागणी करून स्वतः स्वीकारण्याचे मान्य केले होते.

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 

8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण

मंडळाकडून बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज नियमित शुल्कासह भरण्याच्या तारखेमध्ये मुदतवाढ, बारावी बोर्ड परीक्षेचे अर्ज आता 4 जानेवरीऐवजी 18 जानेवारीपर्यत विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी बोर्डाच्या परिक्षेसाठी ऑनलाइन अर्ज नियमित शुल्कासह भरण्याच्या तारखेमध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे. बारावी बोर्ड परीक्षेचे अर्ज आता 4 जानेवारीऐवजी 18 जानेवारीपर्यत विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरता येणार आहे.

बीड : जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या प्रांगणात एका तरुणाने विषारी

द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या तरुणाला तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. इम्तियाज अमिन कुरेशी (वय 30, रा.गेवराई) असं विषारी द्रव प्राशन केलेल्या तरुणाचं नाव आहे.

त्याने विष का घेतलं हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतू इम्तियाज व त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद असून हे प्रकरण पोलीस अधिक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण कक्षात दाखल आहे.

या ठिकाणी दोघांचंही समुपदेशन सुरु आहे. सोमवारी या प्रकरणात तिसर्‍यांदा सुनावणी सुरु करण्यात आली होती. इम्तियाज आणि त्याची पत्नी सुनावणीला हजर होते.

याच दरम्यान त्याने कार्यालयाबाहेर येऊन विषारी द्रव प्राशन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आलं आहे.

अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये 

सहभागी होण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत.. राज्यभरातून भारतीय किसान सभेचे जवळपास दीड हजार कार्यकर्ते दिल्लीला जाणार आहेत.
त्यातील एक जथ्था मुंबई गुजरात मार्गे तर दुसरा जथ्था नागपूर भोपाळ मार्गे दिल्लीकडे निघाला आहे. दिल्ली जवळच्या शहाजानपूर सीमेवर हे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन पुढे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.

6 जून 1674 ला शिवराज्याभिषेक झाला. 

हा दिवस आता राज्यात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार आहे. ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर गुढी उभारुन हा दिवस साजरा होणार आहे.

बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा 

देण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनीच ही भूमिका घेतल्याचं म्हटलं जात आहे.

थोरात आज दिल्लीत असून ते नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे. आता हायकमांड यावर कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागेल.

कोल्हापूर : सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट 

होऊन एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बोरवडे गावात ही धक्कादायक घटना घडली. सुनीता काशिद असं या मृत महिलेचं नाव आहे. घरातील कचऱ्यातून बाटली दारात आणली आणि दारातील कचरा पेटवल्यानंतर सॅनिटायझर बाटलीचा झाला स्फोट झाला. या स्फोटोत महिला 80 टक्के भाजली. त्यानंतर उचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचार सुरु असताना महिलेचा मृत्यू झाला.

बुलढाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 12 जानेवारीला 

सिंदखेड राजा येथे होणारा “जिजाऊ जन्म उत्सव” सोहळा रद्द झाला आहे. आपण आहात तिथेच जन्मउत्सव साजरा करा, असं आवाहन आयोजन समितीने केलं आहे.

हा कार्यक्रम छोट्या स्वरुपात होणार असून त्याच प्रक्षेपण विविध माध्यमातून होणार आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर गर्दी न करण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

पूजन कार्यक्रमासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे , पालक मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे येणार आहे. थोडक्यात होणाऱ्या कार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना या वर्षाचा “मराठा विश्वभूषण पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस 

आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका टाळण्यासाठी राज्यभरातील सर्वपक्षीय आमदारांनी बिनविरोध निवडणुकांसाठी बक्षीस जाहीर केली आहेत.

त्यातील बहुतांश आमदार मराठवाड्यातील आहेत. पारनेर, हातकणंगले, बीड, अकोला, परभणी, करमाळा, बार्शीच्या आमदारांनी बक्षीस जाहीर केलं आहे.

त्यामुळे यंदा किती ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होतात हे पहाणं महत्वाचं असेल. सातवी पासची अट, बिनविरोधचे फंडे, आरक्षण यांवर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. पोपटराव पवारांसह अनेकांनी यावर आक्षेप घेतला आहे.

शाळा आजपासून सुरु होणार

नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि पालघरमधील नववी ते बारावी शाळा आजपासून सुरु होणार आहेत. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळा आजपासून सुरु होतील.

23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला होता. मात्र कोरोनास्थिती पाहता महापालिका आणि जिल्हा स्तरावर शाळांबाबत निर्णय घेण्याची मुभा सरकारने दिली होती.

त्यानुसार आज शाळा सुरु होत आहेत. विद्यार्थी आणि कमर्चाऱ्यांचं थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिमीटर तपासणीसारख्या सुरक्षाउपायांचे पालन करणे गरजेचे असणार आहे.

रोहित शर्मा, शुभमन गिल अन् रिषभ पंत तिसऱ्या कसोटीत खेळणार

सात जानेवारीपासून सिडनी येथे सुरू होणार्‍या तिसर्‍या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी चांगली बातमी आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या जैवसुरक्षा नियमांचा भंग केल्याप्रकरणी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेले रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार आहेत.

मेलबर्नमधील एका रेस्टॉरंटमध्ये या पाच खेळाडूंच्या जेवणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला तपास सुरु करत या पाचही खेळाडूंना अलगीकरणात पाठवलं होतं.

आपातकालीन वापरासाठी परवानगी

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या covishield, भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली होती. ज्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI कडून परवानगी मिळाली आहे. सोबतच कॅडिलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे.

रामदास आठवले यांचा महाविकास आघाडी सरकारल टोला

औरंगाबादच्या नामांतरामुळे वाद होऊन महाविकास आघाडी सरकार पडेल त्यामुळे या नामांतराच्या वादात या सरकारने पडू नये असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

औरंगाबादचं नामांतर करायचं होतं तर पूर्वी सरकार होतं त्यावेळी का केलं नाही असा सवाल यावेळी रामदास आठवले यांनी उपस्थित केला. ते पालघरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुणेकरांनी यावर्षीही विदेशी मद्य पिण्यात मुंबईला मागे टाकलं 

पुणेकर मुंबईकरांपेक्षा काही कमी नाहीत, हे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीमधून सिद्ध झाले आहे. कोरोना महामारीचा काळ तसेच लॉकडाऊन असतानाही यावर्षीही पुणेकरांनी व्हिस्की पिण्यात मुंबईला मागे टाकले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारीनुसार पुणेकरांनी बाजी मारली आहे. विदेशी मद्य पिण्यात पुणेकरांनी 2020 या वर्षभरातील नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्वांना मागे टाकत पहिला नंबर पटकावला आहे.

पुणेकर 185.24 लाख लिटर विदेशी मद्य प्यायले आहेत. पुणेकरांमुळे विदेशी मद्य पिण्यात मुंबईकर मागे पडले असून मुंबई उपनगरकरांनी 170.05 लाख लिटर विदेशी मद्य प्यायली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here