Today Top 25 News | आजच्या सर्वात महत्वाच्या 25 बातम्यांचा आढावा

327

यंदा मान्सून 1 जूनला केरळमध्ये धडकणार; केंद्रीय हवामान विभागाची माहिती

चंद्रपूरमध्ये बोगस हॉस्पिटलवर पोलिसांचा छापा; अवैधरित्या साठविलेली औषधे-इंजेक्शन आणि अन्य साहित्य पोलिसांकडून जप्त

● देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणे अटळ; वैज्ञानिक सल्लागार यांचा इशारा

● बीडमध्ये कर्तव्यावर चाललेल्या एका डॉक्टरला पोलिसांची मारहाण; सदरील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी केले कामबंद आंदोलन

● निवृत्ती महाराज देशमुख यांच्या अडचणी वाढणार; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका

● दिव्यांग प्रमाणपत्र आता ऑनलाईन देणं अनिवार्य; केंद्र सरकारचा निर्णय

● कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला खबरदारीचा इशारा

● बंगालमधील राजकीय हिंसेत 16 जणांचा मृत्यू; मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाखांची मदत देण्याची ममता बॅनर्जींची घोषणा

● प्रसिद्ध रिॲलिटी शो पैकी एक असलेल्या ‘कौन बनेगा करोडपतीचे’ 13 वे पर्व लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

● लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये देशात महाराष्ट्र प्रथम

● मराठा आरक्षणाचा दरवाजा अद्यापही खुला; समाजाने चिथावणीला बळी पडू नये : अशोक चव्हाण

● हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे 38 पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित : आरोग्यमंत्री राजेश टोपे

● रशियाच्या Sputnik Light लसीचा सिंगल डोस कोरोना व्हायरसच्या सर्व स्ट्रेन्सवर परिणामकारक

● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत काही विशेष रेल्वे गाड्या रद्द- पश्चिम रेल्वे

● गोव्यात कोरोनामुळे सध्यस्थीती अत्यंत वाईट झाल्याच्या पार्श्वभूमीवर मालिका, चित्रपटांच्या चित्रीकरणावर बंदी

● अनेक वर्षांच्या विचारमंथनानंतर आयडीबीआय बँकेच्या विक्रीस (स्ट्रॅटेजिक सेल) केंद्र सरकारने मंजुरी दिली

● भारतीय कुस्तीपटू सत्यव्रत कादियन आणि सुमित मलिक यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या आशा कायम ठेवल्या

● एमजी मोटर्सकडून आपली ऑटोनॉमस एसयुवी एमजी ग्लोस्टरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. ही देशातील पहिलीच सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे

● तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांनी आपल्या सिरीयलचे शुटिंग मुंबईबाहेर हलवण्याचा निर्णय घेतला

▪️ लातूर जिल्ह्यात लसीकरणाची गती काही वाढेना; आत्तापर्यंत 2 लाख 1 हजार 506 जणांनी घेतला पहिला डोस, तर 18 ते 44 वयोगट 3200 जणांना लस

▪️ पालथे झोप आणि रक्तातील ऑक्सिजन वाढवा, तज्ज्ञ डॉ. विश्रांती भरती यांचा सल्ला

▪️ गत वर्षी नुकसान भरपाई न देणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करा, पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

▪️ लातूर जिल्ह्यात सोयाबीनची आवक वाढली, दर उच्चांकी 7 हजार 330 रुपयांचा भाव

▪️ पालकमंत्री शंकरराव गडाख आज जिल्हा दौऱ्यावर; ऑक्सिजन लाईन, प्रकल्पाची करणार पाहणी

▪️ कळंब तालुक्यातील 14 गावांत कडकडीत संचारबंदी, रुग्णसंख्या वाढल्याने घेतला निर्णय

▪️ तालुक्यातील मानेवाडी येथे भाऊजींच्या अंगावर टेम्पो घालून केला खून; गुन्हा दाखल, बहिणीला त्रास दिल्याचा राग

▪️ उस्मानाबाद जिल्ह्यात 1 लाख 40 हजार नागरिकांना पहिला डोस; तर 26 हजार नागिरकांना मिळाला दुसरा डोस

▪️ नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे 661 रुग्ण; तर 17 जणांचा मृत्यू, 1 हजार 273 रुग्णांची कोरोनावर मात

▪️ ऑनलाईन लसीकरण करूनच लसीकरण केंद्रावर जा – मनपा आरोग्य विभागाचे आवाहन

▪️ नांदेड जिल्ह्यात दारूविक्री सुरूच; नांदेड, कंधार तालुक्यातील दारू अड्ड्यांवर पोलिसांचा छापा

▪️ शेतकऱ्यांना दिलासा! कृषी दुकाने आता सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत सुरु राहणार, नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here