Breaking News | एमबीबीएसच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार
● एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
Positive News
● धुळे जिल्ह्यातील 86 वर्षीय आजीबाईंनी घरीच औषधोपचार घेऊन कोरोनावर मात केली. साक्री तालुक्यातील बळसाणे येथील रियादबी पटेल (ह.मु. दोंडाईचा) असे या आजींचे नाव आहे.
Nanded News
● जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पोहचली 873 वर तर आता गेल्या 24 तासात 1247 रुग्ण कोरोनामुक्त
● नांदेड महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले ; 1600 कर्मचारी आर्थिक संकटात.
● नायगाव तालुक्यातील मांजरम येथे वीज पडून एक म्हैस व वगार मृत्युमुखी
● नांदेड जिल्हा कोविड सेंटर परिसरात जैविक कचऱ्याचा ढीग ; सुपरब हायजेनिक डीस्पोजल कंपनीचा निष्काळजीपणा .
Osmanabad News
● सलग दुसऱ्या वर्षी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची चैत्र पोर्णिमा यात्रा भाविकांशिवाय पार पडली; कोरोनाच्या सावटाखाली तुळजाभवानी मातेचे सर्व धार्मिक विधी साधेपणाने पार पाडण्यात आले
● 4 हजार रुग्णांच्या सेवेसाठी केवळ 900 आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांची पदे रिक्त; मदतीसाठी पुढे येण्याचे परिसरातील खासगी डॉक्टरांना प्रशासनाचे आवाहन
● शहरातील कोरोनाबाधितांचे प्रमाण घटतेय, आता ग्रामीण भागात वाढ, पालकमंत्र्यांची माहिती; प्रत्येक नागरिकापर्यंत जाण्याच्या सूचना
● लोहारा तालुक्यातील 17 गावांमध्ये जनता कर्फ्यू, गावांच्या सीमा पुन्हा बंद; पुढील आदेश येईपर्यंत बंदी पाळण्याची उपविभागीय अधिकाऱ्यांची सूचना
Aurangabad News
● जिल्ह्यात दिवसभरात 1039 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, तर 28 रुग्णांचा मृत्यू
● जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असून तो सुरळीत ठेवण्याची खबरदारी प्रशासन घेत आहे; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती
● पैठण येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रात तातडीने डिसीएचसी सुविधा सुरू करावी : रोहयो मंत्री संदीपान भुमरे
● जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.52 टक्के; जिल्हाधिकारी यांची माहिती
● शहरात कुठे लॉकडाउन तर कुठे अनलॉकची परिस्थिती; नागरिकांचा बहुतांश ठिकाणी सर्रासपणे वावर
● शहरात लस घेण्यासाठी केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी; सोशल डिस्टनसिंगचा उडाला फज्जा
● विद्यापीठाकडून कन्नड तालुक्यातील सहा गावे दत्तक; 2.62 कोटी अनुदान देखील मंजूर
● शहरातील ‘सॅटर्डे फॉर सोसायटी’ ग्रुपच्या तरुणांनी छोट्या-छोट्या व्यावसायिक गरजूंना केले किराणा किटचे वाटप
● रेमडीसिवियर इंजेक्शन चोरणाऱ्या आणि काळाबाजार करणाऱ्यांना रस्त्यावर आणून मारू : खासदार इम्तियाज जलील
● भगवान महावीर रसोईघरतर्फे घाटीतील 400 जणांना रोज मोफत जेवणाची व्यवस्था
● लॉकडाऊनचा परिणाम; एसटीच्या उत्पन्नात कमालीची घट
● वाळूज येथील गरवारे कंपनीतर्फे घाटी रुग्णालयाला दोन व्हेंटिलेटरची भेट