Today Top 25 News | आजच्या महत्वाच्या 25 बातम्यांचा मागोवा

202

सांगली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

● लातूर जिल्ह्यात ३२ केंद्रांवर लसीकरण ठप्प तर फक्त ६ केंद्रच सुरू : तीन दिवसांपासून १००० इंजेक्शन देण्याचे नियोजन

● लातूर व अहमदपूरमध्ये सर्वाधिक बेजबाबदार; ३ दिवसांत ७७३ जणांकडून संचारबंदीचे उल्लंघन

● वाळूसह तीन ट्रॅक्टर जप्त; लातूर तहसीलची कारवाई

● रस्त्याच्या बोगस कामाची तक्रार केल्यावरुन मारहाण; उदगीर तालुक्यातील घटना; परस्परविरोधी गुन्हे दाखल

● नांदेड जिल्ह्यात दिवसभरात 702 पॉझिटिव्ह आढळले; तर 25 रुग्णांचा मृत्यू; 1311 रुग्णांना डिस्चार्ज

● नांदेड जिल्हा प्रशासनाने मागितल्या 15 हजार रेमडेसिवीर; प्राप्त झाल्या केवळ 192 इंजेक्शन

● मुखेड तालुक्यात 36 गावांना पाणी टंचाईच्या झळा; पंचायत समितीत टँकरचा प्रस्ताव दाखल

● लोहा तालुक्यात निराधारांची उपासमार; थकीत मानधन पोस्ट खात्यात जमा

● उस्मानाबाद जिल्ह्यात कोरेाना रूग्णांची संख्या पुन्हा वाढली असून, दिवसभरात सोमवारी 814 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 13 जण कोरेानाने दगावले आहेत

● तुळजापूर : कडक डाऊनच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी धडक कारवाई करत शहरातील 3 दुकाने सील केली; मुथ्थुट फायनान्ससह 3 दुकानदारांकडून प्रत्येकी 1 हजार रुपये दंड वसूल

● कोरोनाग्रस्तांच्या दारात अन्नपूर्णा, दररोज 100 जणांना मोफत जेवण; उस्मानाबादेत कोरोना काळात महत्त्वाचा उपक्रम, एकाच कुटुंबात अनेकजण पॉझिटिव्ह येत असल्याने कुटुंबीयांची अडचण

● कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाची खासगी दवाखान्यासमोर तडफड, मृत्यूनंतर 5 तासांनी घंटागाडीत नेला मृतदेह; तेरमधील प्रकाराने संताप शववाहिकेअभावी कचरा गाडीतून मृतदेहाचा अंतिम प्रवास

● कोरोनाबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रावरील लस संपण्याची धास्ती; रुग्णांची वाढती गर्दी, 45 वर्षांवरील नागरिकांना पुरेशी लस मिळेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here