Today Top 50 News | आजच्या अतिशय महत्वाचा 50 बातम्यांचा वेगवान आढावा !

261
Today Top News

राज्यात दिवसभरात 82 हजार 266 रूग्ण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट 86.03 टक्के; 53 हजार 605 नवीन बाधित आढळले असून, 864 रूग्णांचा मृत्यू

कोरोना विरोधातील लढाईत अदानी ग्रुपचाही पुढाकार; 48 क्रायोजेनिक टँकची केली खरेदी; हे टँक 780 टन लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करण्यास सक्षम आहेत.

● देशात ऑक्सिजन आणि औषधांची व्यवस्था सुधारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 12 डॉक्टर्सच्या टास्क फोर्सची निर्मिती

● कोरोना सेंटरमध्ये भरती होण्यासाठी कोविड रिपोर्ट नको, कोणत्याही रुग्णाची अडवणूक करता येणार नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेश

● कोरोनाविरोधातील लढाईत डीआरडीओचं दुहेरी अस्त्र, कोरोनावरील प्रभावी औषधासोबतच, सॉफ्टवेअरचीही निर्मिती

● मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र, महाराष्ट्रातील लसीकरणासाठी वेगळं अॅप बनवण्याची परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांची मागणी

● देशातील 180 जिल्ह्यांत 7 दिवसांत एकही नवा कोरोना रुग्ण नाही, 54 जिल्ह्यांत 3 आठवड्यांत नवा कोरोनाग्रस्त नाही, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती

● राज्यात लॉकडाऊन वाढणार की नाही, 15 तारखेला होणार निर्णय, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

● कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्ही रेट 13.95 टक्के आहे. तो गेल्या सात दिवसांत 24.02 टक्के झाला आहे. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 18 मेपर्यंत 25 हजारांवर जाईल, अशी शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे.

● डीआरडीओच्या कोरोना प्रतिबंधक औषधाला देशात आपत्कालिन परिस्थितीत वापरासाठी डीजीसीआयची मंजुरी

● कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ठाकरे सरकारचा ॲक्शन प्लॅन, राज्यातील फॅमिली डॉक्टर्सची मदत घेण्याचा निर्णय

● अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूरनंतर आता कंगना रणौतही कोरोनाच्या विळख्यात, कंगनाने सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

● रेमडेसिवीरच्या रॅकेटमध्ये डॉक्टर, नर्सेसचा समावेश; पाच जणांना अटक; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

● ऑक्सिजन आणि ऑक्सिजन्य साहित्यावरील जीएसटी हटवा; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची अर्थ मंत्रालयाकडे मागणी

● ओळखपत्र, RT-PCR रिपोर्ट नसला, तरी कोविड संशयित रुग्णांना दाखल करुन घ्यावं लागणार; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राष्ट्रीय धोरणात मोठे बदल

● ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याकडे गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी सायबर पोलिसांचे पथक लवकरच हैदराबादला जाणार

● कोरोना मृत्यूंशी 5G चाचण्यांचा संबंध नाही; केंद्रीय माहिती जनसंपर्क विभागाचे (पीआयबी) निवेदनाद्वारे स्पष्टीकरण; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

● भारतीय अमेरिकन डॉक्टरांकडून 5 हजार ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची मदत; भारतातील अपुरी वैद्यकीय यंत्रणा पाहता निर्णय

● भारताची कुस्तीपटू सीमा बिस्लाने शनिवारी जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले

● कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावली सारा अली खान; सोनू सूदने केले कौतुक; सोनू सूद फाऊंडेशनसाठी साराने दिले योगदान

● देशभरात ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आज एकूण 12 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

● लातूर जिल्ह्यात मागणी तसा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरणाला अडथळे; ज्येष्ठांचा दुसरा डोस वेटिंगवर, तर केवळ १८-४४ वयोगटांत लस

● जिल्हा चिकित्सकांनी निलंबित केलेल्या वैद्यकीय अधिका-याची चौकशी; उपचारासाठी दाखल रुग्णांना रुग्णालयात औषध व इंजेक्शन उपलब्ध असताना खाजगी मेडिकलमधून औषधी घेण्यास सांगितले होते

● देवणीतील ९ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल; निर्धारित वेळेनंतरही आपली दुकाने सुरू ठेवल्याने व्यापाऱ्यांवर कारवाई

● लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी अधिकारी रस्त्यावर; तर विनाकारण फिरणाऱ्या १०० दुचाकीचास्वारांवर दंडात्मक कारवाई

● उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी ६२९ नवे रुग्ण आढळले; दिवसभरात ८४१ जण कोरोनामुक्त; काेरोनाने ११ जणांचा मृत्यू झाला

● गडपाटी येथील स्वाधार गतिमंद मुलींच्या बालगृहातील तब्बल ५१ मुलींना कोराेना संसर्ग झाला असून, दोन कर्मचारीही कोरोनाबाधित आढळले आहेत

● नागरिकांचा गावाकडे ओघ, पाण्याची मागणी वाढली, प्रकल्पांत २४ टक्के साठा; जिल्हयातील २१३ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणी

● ग्रामीण भागामध्ये संसर्गाचा कहर, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई; उमरगा तालुक्यात मे मधील ७ दिवसांत ४४१ पाॅझिटिव्ह

● बीड नगर पालिकेच्या माध्यमातून बीडमध्ये ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभा राहणार

● एसआरटीमध्ये सुविधा वाढवा !आ.मुंदडा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

● बीड जिल्ह्यात आज 1339 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

● कोरोनाने मरण पावलेल्या एकाही शिक्षकाच्या कुटुंबियांना अद्याप विमा मिळाला नाही

● मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सर्व संघटनांची बैठक; आता मूक नाही तर ठोक मोर्चा, मराठा समाजाचा इशारा

● आरोग्य विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी

● औरंगाबाद जिल्ह्यातील 476766 जणांचे कोविड लसीकरण, शनिवारी ग्रामीण भागात 1537 तर शहरी भागात 6130 जणांचे लसीकरण

● औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात 774 कोरोनाबधित रुग्णांची वाढ, 24 रुग्णांचा मृत्यू

● गृह अलगिकरणातील रुग्णांची विशेष काळजी घ्यावी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे निर्देश

● औरंगाबाद शहरातील बालकांमधील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपाचा मास्टर प्लॅन रेडी, एमजीएम येथे 100 खाटांचे बालकांसाठी कोरोना रुग्णालय सुरू करणार

● औरंगाबादेत पहाटेच दुकाना उघडून नागरिकांची गर्दी जमवणाऱ्या 50 पेक्षा अधिक दुकानावर पोलिसांची कारवाई, त्या सर्व दुकाना सील

● औरंगाबादेत लवकरच गरवारे कंपनी उभारणार मुलांसाठी कोविड हॉस्पिटल, विभागीय आयुक्तांनी केली पाहणी

● औरंगाबाद-वैजापूर महामार्गावरील हॉटेल पंचवटी जवळ स्विफ्ट व अल्टो कारचा अपघात, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही.

● पुणे शहरात दिवसभरात 2837 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ, तर पुणे शहरात दिवसभरात 4673 रुग्णांना डिस्चार्ज

● माणिकडोह येथील बिबट्याची गरज पडल्यास आरटीपीसीआर टेस्ट केली जाईल, अशी माहिती सहायक वनसंरक्षक अमित भिसे यांनी दिली आहे.

● पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 4 हजार 261 रुग्ण आहेत, तर 7 लाख 89 हजार 727 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली

● पुणे – नाशिक महामार्गावर संगमनेरजवळ असलेल्या चंदनापुरी घाटात टोमॅटो वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन एकजण ठार, तर ही घटना आज (शनिवारी) दुपारी घडली

● पुण्यात या तृतीय पंथीयांच्या “महामारी संपेल, पण माणुसकी जपा” असा संदेश देत ह्युमिनीटी फाउंडेशनने दुर्लक्षित असणाऱ्या तृतीय पंथीयांना दिला मदतीचा हात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here