Today Top 50 News | लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील बातम्यांसह महत्वाच्या 50 बातम्यांच्या झटपट आढावा

304
Today Top News

राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती, सामान्य प्रशासन विभागाचा आदेश

महाराष्ट्रासह 14 राज्यांना ‘कोव्हॅक्सिन’चा थेट पुरवठा; भारत बायोटेकच्या संचालिकांची माहिती

● राज्यातील पहिला म्युकोरमायकोसिस रुग्ण ठाण्यात आढळला, कोरोनाग्रस्त महिलेला लागण

● अमेरिकेकडून भारताला 50 कोटी डाॅलरची मदत, मोदी-बायडेन चर्चेनंतर अवघ्या पंधरा दिवसात मिळाला दिलासा

● आधी स्वत:ला सांभाळा, मग लोकांना मदत करा; नितीन गडकरींचा नेते, कार्यकर्त्यांना सल्ला

● बिहारमध्ये गंगा नदीत कोरोनाग्रस्तांचे मृतदेह, चौकशीचे आदेश; कटीहार नदीतही आढळले मृतदेह

● अध्यक्षपदाची निवडणूक तिसऱ्यांदा पुढे ढकलली; काँग्रेसने आता झटक्यांची नोंद घ्यायला हवी : सोनिया गांधी

● दक्षिण कोरियाची दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाईने झळकवला त्यांच्या पहिल्या मायक्रो एसयुवीचा टीझर, 4 लाख रुपये किंमत असण्याची शक्यता

● दिग्दर्शक संजय लिला भन्साळींचा आगामी सिनेमा ‘इजहार’ मध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान झळकणार

● लातूर येथील जुना औसा रोड भागातील सद्गुरूनगरमध्ये एका अपार्टमेंटमधील घर चोरट्यांनी फोडून २ लाख २ हजार ५०० रुपयांचे ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

● ठप्प झालेले लसीकरण मंगळवार, दि. ११ मे रोजी जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली

● जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६९६ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८८२ जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.

● उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट सुरूच; दिवसभरात 833 रुग्णांची नोंद

● 12 मे पासून उस्मानाबाद जिल्ह्यात जीवनावश्यक सेवा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू : जिल्हाधिकारी

● कोविडची तिसरी लाट सक्षमपणे थोपवून परत लावण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा : राज्यमंत्री बनसोडे

● कळंब येथील कोविड सेंटरला खासदारांची भेट

● बीड जिल्ह्यात दिवसभरात 1295 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

● बीडमध्ये मराठा समाज आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची केली होळी

● अवकाळीने धारुर तालुक्यातील उन्हाळी पिके उध्वस्त; तहसीलदार पंचनामा करण्यासाठी जहागीर मोहात

● नांदेडच्या विष्णूपुरी प्रकल्पाशेजारील असर्जन शिवारात तरूणाचा खून; घटनास्थळी मृतदेहा शेजारी दोरी आढळून आली आहे

● भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवून १५ लाख लुटले; याप्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे

● २१ क्विंटल मिरच्या घेऊन पैश्यांसाठी टाळाटाळ; धनादेश बाउंसप्रकरणी मुंबईच्या व्यापाऱ्यास अटक; आरोपी आकाश राजनाथ यादव यास अवघ्या २४ तासात जेरबंद करून गजाआड केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here