Today Top 50 News | देश, विदेशातील बातम्यांसह लातूर, उस्मानाबाद, नांदेड व बीड जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या

282
Today Top News

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोल शंभरी पार; महिन्याभरात 15 वेळा इंधनाची दरवाढ

राज्यात दिवसभरात 31 हजार 964 जण कोरोनामुक्त; 443 रूग्णांचा मृत्यू; दिवसभरात 20 हजार 295 नवीन कोरोनाबाधित आढळले

● कोरोनाची तिसरी लाट : मराठवाड्यातील 400 बालरोगतज्ज्ञ संभाव्य तिसऱ्या लाटेत करणार काम; बीड, बुलडाणा, हिंगोली येथील बालरोगतज्ज्ञांना दिले प्रशिक्षण

● राज्यभरात शनिवारी मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; नगर, नाशिक आणि लातूर जिल्ह्यांत वीज पडून पाच जणांचा मृत्यू; पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

● केंद्राकडून रेमडेसिविर पुरवठा बंद; राज्यांकडे पुरेसा साठा असल्याने आता केंद्राकडून पुरवठ्याची गरज नाही; केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांचा दावा

● मान्सूनच्या तोंडावर चक्रीवादळ येणार हे गृहीत धरून चक्रीवादळरोधक वीज, पायाभूत सुविधा कशा उभारता येतील, याचा अभ्यास सुरू

● देशात प्राणवायूचा तुटवडा प्रकर्षाने जाणवत असून त्याला सरकारची अकार्यक्षमता आणि नियोजनाचा अभाव कारणीभूत : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी

● पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेले मेजर विभूती शंकर धौंडियाल यांच्या पत्नी निकिता कौल लष्करात लेफ्टनंट पदावर दाखल

● उत्तरप्रदेशमधील अलिगढमध्ये विषारी दारू पिल्याने आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू; 6 आरोपींना अटक, तर 5 पोलिसांचं निलंबन

● टी-20 विश्वचषक स्पर्धा महाराष्ट्रात; ‘बीसीसीआय’च्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रस्ताव; ‘आयसीसी’कडे निर्णयासाठी एक महिन्याच्या मुदतीची मागणी

● पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने डॉक्टर्सनी वेळीच कोविड लक्षणे ओळखून उपचार सुरु करावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

● सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कार विजेत्या सावनी रवींद्रने दिली गुड न्यूज; तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत

● ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय कायद्याला धरून नाही: प्रकाश आंबेडकर

● काँग्रेसच्याच पुण्याईवर देश चालतोय, मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज; संजय राऊतांचा घणाघात

● झोपेत सरकार कसं आणायच ते अजित पवारांना माहीत; जरा सांभाळून बोला : चंद्रकांत पाटील

● ‘संभाजीराजे आमचेच खासदार, आरक्षणासाठी भाजपचे प्रयत्न त्यांना माहित आहेत’- गिरीश महाजन

● लातूर जिल्ह्यात दिवसभरात 181 कोरोना पाॅझीटिव्ह रुग्ण तर 390 रुग्ण कोरोनमुक्त; 24 रुग्णांचा मृत्यू

● अहमदपूर – साईबाबा शुगरच्या आर्थिक व मानसिक ञासास कंटाळून 11 शेतकर्‍यांचा सामूहिक जलसमाधीचा इशारा; तहसीलदारांना निवेदन

● लातूर – वनविभागात पाच वर्षात झालेल्या खर्चाची चौकशी; पालकमंञी अमित देशमुख यांनी दिले चौकशीचे आदेश

● जिल्ह्यात पेट्रोल – डिझेल दरांचा उच्चांक; पेट्रोल 101 रुपये 18 पैसे तर डिझेल 91 रुपये 73 पैसे

● उदगीर शहरात विकेंड लाॅकडाऊनचा फज्जा; विकेंड लाॅकडाऊन असतानासुद्धा बरीच दुकाने सुरु असल्याचे पहायला मिळाले

● देवणी – दवणहिप्परगा मार्गावरील अतिवृष्टीने वाहून गेलेल्या पुलांची दुरुस्ती करण्याची मागणी

● औसा – खरोसा परिसरात जोरदार पावसाची हजेरी

● उस्मानाबाद जिल्ह्यात 303 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

● येरमाळा : वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसामुळे बसस्थानकातील पत्रे उडाले

● शहरात मनाई आदेश झुगारुन दुकान सुरु ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

● नांदेड जिल्ह्यात शनिवारी 183 नवे रुग्ण तर 209 जणांना डिस्चार्ज

● नांदेड जिल्ह्यात सोयाबीन बॅगची किंमत वाढल्याने शेतकरी हवालदिल

● राज्यात न्यायाधीशांच्या बदल्या; नांदेडचे दोन न्यायाधीशांची बदली

● जिल्हा परिषद केवळ वित्त विभागावर मेहेरबान; 14 कर्मचाऱ्यांना मिळाली पदोन्नती

● दक्षिण विभागाचे बांधकाम कार्यालय देगलूरला हलवले

● जिल्हा मध्यवर्ती बँक एटीएम सुविधा पुरविणार; उपाध्यक्ष भोसीकर यांची माहिती

● पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश; जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेला आणखी 7 नव्या रुग्णवाहिका प्राप्त

● बीड जिल्ह्यात दिवसभरात 536 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

● बीड जिल्ह्यातील तवलवाडीत घटसर्पाने 100 जनावरांचा मृत्यू; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

● यंदा बीड झेडपी लागवड करणार 60 लाख वृक्ष

● कोरोना बाधितांच्या अस्थींना नातेवाईकांची प्रतीक्षा; मृतांचे नातेवाईकच अस्थी घेऊन जाण्यास येत नसल्याने कर्मचारीच करतायत अस्थी विसर्जन

● टपाल विभाग करणार लोकनेत्याचा सन्मान; पुण्यतिथी दिनी होणार गोपीनाथ मुंडे यांच्या तिकिटाचे प्रकाशन

● परळीच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची प्रचंड गर्दी; आरोग्य विभागाचा नियोजन शून्य कारभार

● जिल्ह्यातील सर्व बँका 31 तारखेपासून पूर्ण वेळ राहणार सुरु, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आदेश

● 17 वर्षाच्या लेकीचे झाले अपहरण अन् शोधण्यासाठी पोलिसांनी मागितले 40 हजार रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here