Today Top News | आजच्या महत्वाच्या बातम्यांचा मागोवा

416
Today Top News

● महाराष्ट्रासाठी गुडन्यूज, ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ आज नाशिकला पोहोचणार

● राज्यातील ऑक्सिजननिर्मिती वाढविण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा पुढाकार, आजपासून 10 ते 15 टन ऑक्सिजन मिळणार

● लस आणि रेमडेसिवीर आयात करू द्या ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

● ब्रिटनच्या लसीमुळे कोरोना होण्याचे प्रमाण 65 टक्क्यांनी कमी; अभ्यासातून माहिती समोर

● राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी ऑक्सिजन तुटवड्यासाठी साखर कारखान्यांना दिले निर्मिती करण्याचे आदेश

● कोरोनाग्रस्तांच्या होणाऱ्या मृत्यूला केंद्र सरकार जबाबदार, राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

● आंदोलकांवर लसीची सक्ती नको; भारतीय किसान युनियनच्या नेत्याचा इशारा

● स्मार्टफोन धारकांसाठी खुशखबर ! ‘रिअल मी’ चा सर्वात स्वस्त 5G फोन झाला भारतात लाँच

● मुंबईला पराभवाची धूळ चारत पंजाबने सामना 9 विकेटने जिंकला

● ‘गोकुळधामची दुनियादारी’ आता युट्यूब चॅनेलवरही उपलब्ध, मालिकेला काही दिवसांतच मिळाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

Latur News

● लातूर जिल्ह्यात कोरोना लसीकरण ठप्प! ४ लाख ९५ हजार डोसची केली मागणी : सध्या केवळ ११ हजार डोस शिल्लक

● जिल्ह्यात शुक्रवार रोजी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण १४७८ आढळले. २६ जणांचा कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झाला

● शिवाजी नगर पोलिसांनी शुक्रवारी (तीन ठिकाणी धाडी टाकून २ लाख ३ हजार ७३६ रूपयांची अवैध देशी, विदेशी दारू जप्त केली

● लातुरात ५० हजार लसीकरण पूर्ण मनपा लसीकरण केंद्र आज बंद राहणार

Nanded News

● जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या स्थिर, 1337 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी, शुक्रवारी 1210 रुग्ण पॉझिटिव्ह , तर 28 रुग्णांचा मृत्यू.

● जिल्ह्यातील 13 मुख्य रस्त्यांसाठी केंद्राचा 196 कोटी 20 लाख 34 हजार रुपयांचा निधी मंजूर .

● पहिल्याच दिवशी कडक लॉकडाऊनचा फज्जा; अनेक लोक रस्त्यावर.

● कोरोना रुग्ण व नातेवाईकांच्या जेवणासाठी कामठ्याच्या स्वामी ग्रुपचा पुढाकार ; 1 मे पर्यंत दररोज 200डब्बे पोहचवणार

Osmanabad News

● जिल्ह्यातील चार एअर ऑक्सीजन प्रकल्पास मंजुरी- पालकमंत्री गडाख.

● उस्मानाबाद जिल्ह्यात आज 719 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 881 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

● उस्मानाबाद जिल्ह्यात 16 मृत्यू झाले आहेत, तर 5 मृत्यू हे 72 तासाच्या आतील आहेत. जिल्ह्यातील एकूण मृत्यू हे 816 झाले आहेत.

● खा. ओमराजे यांची लोहारा ग्रामीण रुग्णालय, व उपजिल्हा रुग्णालयास भेट.

● उस्मानाबाद शहरात विनाकारण फिरणाऱ्याची केली कोरोना टेस्ट.

● तेरणा बाबत मा.उच्च न्यायालयाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा ! आ.राणा पाटील.

● येरमाळा येथील, आई येडेश्वरीची यात्रा या ही वर्षी रद्द करण्यात आलेली आहे.

Beed News

● अजित कुंभार, रामास्वामी जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून, ऑक्सीजन, रेमडिसीवीरसह आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला

● आमदार सुरेश धस यांची संपूर्ण मतदार संघातील गावो-गावी, खेडो-पाडी अँटीजन टेस्ट व आधार जनजागृती मोहीम

● बीड जिल्ह्यात आज 1210 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

● आता केवळ दोन तासच चालणार बँका : रवींद्र जगताप

● विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here