राज्यसभा सदस्य खा. राजीवजी सातव यांना जळकोट व निलंगा काँग्रेस कमिटीच्यावतीने श्रध्दांजली

239

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निमंत्रक राज्यसभा सदस्य खा.राजीवजी सातव यांना जळकोट तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

मराठवाड्याचे युवा नेतृत्व खा.राजीवजी सातव यांचे दि.१६ रोजी निधन झाले.

त्यांना जळकोट तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने श्रध्दांजली कार्यक्रम प्रसंगी जेष्ट नेते मन्मथप्पा किडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारोती पांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जून पाटील, जि.प. सदस्य बाबूराव जाधव, शहराध्यक्ष महेश धूळशेट्टे, उपाध्यक्ष दत्ता पवार, लक्ष्मण तगडमपले, संग्राम नामवाड, कैलास पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, संग्राम कांबळे, सिद्धार्थ सूर्यवंशी, पाशा शेख, सुधाकर सोनकांबळे, आयुब शेख, माधव होणराव, मधूकर हलकरे, विश्वनाथ जाधव, नागेश पवार, राजेंद्रकुमार वाघमारे, मारोती अंधारे, संदिप उगिले, शंकर कोळनूरे आदी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

निलंगा काँग्रेस तर्फे श्रद्धांजली

आज खा. राजीव भाऊ सातव यांना निलंगा काँग्रेस पक्षाच्यावतीने तालुका काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी काँग्रेस नेते अभय साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, जिल्हा सरचिटणीस अजित निंबाळकर, शहराध्यक्ष गोविंद शिंगाडे, माधवराव पाटील, शकील पटेल, सिद्धेश्वर बिरादार, गिरीश पात्रे, प्रकाश गायकवाड,पवन सुरवसे, तगरखेडा सरपंच रणजित सुर्यवंशी, उपसरपंच मदन बिरादार, प्रशांत बिरादार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here