लातूर जिल्ह्यात दुचाकीवरील रक्कम पळवणारी टोळी सक्रिय | पोलिसांसमोर आव्हान

172

लातूर जिल्ह्यात दुचाकीवरील रक्कम पळवणारी टोळी सक्रिय आहे. जिल्ह्याती तीन ठिकाणी घडलेल्या घटनेमध्ये तब्बल 4 लाख 50 हजार रुपये पळवण्यात आलेले आहेत.

निलंगा शहरातील राघो ट्रेडिंग कंपनीजवळ मोहन सदाशिव चवनहिप्परगे (रा. लोंढेनगर, निलंगा) यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीमधून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख रुपये पळवून नेले. अज्ञात दोघांविरुद्ध या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औसा येथील एसबीआय बँकेजवळ फिर्यादी शेख महेबुब चाँदसाब रा.नागरसोगा ता. औसा यांनी एसबीआय बँकेमधून 2 लाख रुपये काढले होते. सदरील रक्कम आणि इतर कागदपत्रांची बॅग त्यांनी मोटारसाकलला अडकवली होती.
मित्राला बोलत असताना अज्ञात व्यक्तीने मोटारसायकलवरील दोन लाख रुपये आणि कागदपत्रे असणारी पिशवी पळवली. औसा पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर शहरातील चंद्रनगर भागामध्ये महेश शहाजीराव साळुंके (रा. खाडगाव) याच्या जवळ येऊन चोरट्याने तुमचे पैसे खाली पडले आहेत असे सांगून दुचाकीला त्यांनी लावलेली पिशवी पळवली.

पिशवीमध्ये 50 हजार रुपये, हिशोबाचे रजिस्टर, कॅल्यूलेटर होते. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here