Pulwama Attack ला दोन वर्षे | देश आजही या घटनेवर सुन्न, २२ वर्षीय तरुणाने केला होता हल्ला

169
pulwama-hamla

नवी दिल्ली : देशाच्या इतिहास काळा दिवस म्हणून त्याची नोदं झाली. या घटनेला आज दोन वर्षे झाली. १४ फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र व्हॅलेंटाइन डे म्हणजे प्रेमाचं प्रतीक म्हणून साजारा केला जातो. 

मात्र दोन वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला ( Pulwama Attack ) करून हा दिवस रक्तरंजित केला. या घटनेने संपूर्ण देश हादरला. १४ फेब्रुवारी २०१९ ही घटना झाली. 

पुलवामा हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. पुलवामा जिल्ह्यात स्फोटकांनी भरलेल्या गाडीने जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याने सीआरपीएफच्या जवानांच्या बसला धडक दिली, त्यात ४० जवान शहीद आणि अनेक गंभीर जखमी झाले.

पाकिस्तानमध्ये बसलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्यांनी या हल्ल्याचा कट रचला होता. पण सीआरपीएफच्या बसला निशाणा करण्याची डाव हा पुलवामामधील काकापोरा येथील एका दुकानदाराचा असल्याचं तपासात तपासात समोर आले.

पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणात एनआयएने १३५०० पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. यात दुकानदाराचे नाव शाकीर बशीर मागरे असे देण्यात आलं आहे. आरोपपत्रात एकूण १९ आरोपींची नावे आहेत. 

त्यापैकी ६ ठार झाले आहेत. तर १३ जिवंत आहेत. आरोपींमध्ये जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर आणि त्याचे दोन भाऊ- रऊफ असगर मसूद आणि मौलाना अम्मर अली यांचीही नावं आहेत.

अमेरिकेची एजन्सी एफबीआयनेही या हल्ल्याचा पुरावा गोळा करण्यात मदत केली. आरोपींपैकी २२ वर्षांचा शाकीर हा जम्मू-श्रीनगर महामार्गावर लेथपोरा पुलाजवळ फर्निचरचं दुकान चालवत होता.

दहशतवादी हल्ल्याचा सर्वात महत्त्वाचा स्थानिक संबंध तो होता. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफच्या ताफ्यातील एका बसला स्फोटकांनी भरलेल्या कारने दहशतवाद्यांनी जोरदार धडक दिली.

यावेळी झालेल्या स्फोटात बसमधील सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. शाकिरला एनआयएने अटक केली होती. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरचा पुतण्या उस्मान हैदर ऑक्टोबर २०१८ मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाला होता.

यानंतर मसूद अझरचा दुसरा पुतण्या मोहम्मद ओमर याला सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची जबाबदारी देण्यात आली. मोहम्मद ओमर आणि त्याच्या साथीदारांनी कार स्फोटाचा कट रचला होता. पण त्यावर चर्चा सुरू होती.

त्याच वेळी शाकीरने महामार्गावरून जात असलेल्या सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष्य करण्याचं सुचविलं. त्याचं दुकान महामार्गाच्या कडेला होतं. यामुळे तो सुरक्षा दलाच्या हालचालींवर नजर ठेवून होता, असं एनआयएच्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

शाकीरनेच महामार्गाच्या एका वळणार आणि उतारावर हल्ल्याचा सल्ला दिला होता. शकीरच्या घरी आयईडीही गोळा करण्यात आला आणि स्फोटकांनी भरलेली कार तोचो चालवत होता. इतकंच नाही तर शकीरने मोहम्मद ओमर आणि त्याच्या साथीदारांना त्याच्या घरी अनेकदा थांबवले होते.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये दहशतवाद्यांविरूद्ध मोठी कारवाई केली.

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आणि काश्मीरमधील पाकिस्तानचा हस्तक्षेप पूर्णपणे रोखण्यासाठी, फुटीरतावाद दूर करण्यासाठी आणि दहशतीच्या मुळं उपटून काढण्यासाठी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला. कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरला दोन केंद्र शासित प्रदेशात विभागले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here