उदगीर मतदारसंघाचा चौफर विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : ना.बनसोडे

600

उदगीर तालुक्याचा विकास करण्याची संधी भेटली म्हणून मी आपली विनम्रपणे सेवा करीत आहे.

आपल्या सहकार्याने मी नामदार झालो. तालुक्याच्या विकासाचा संकल्प करून विकासाचा आरखडा तयार केला आहे.

उदगीर मतदारसंघात अनेक चौफर विकासाचे बदल झालेले पहायला मिळतील, असा विश्वासही व्यक्त केला.

राजकारणापलीकडे जाऊन आपल्याला मतदार संघाचा विकास करायचा आहे, अशी अपेक्षा ना.संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.

काल दि. 24 रोजी कृषी उत्त्पन्न बाजार समिती उदगीर जिल्हा लातुरची वार्षिक सर्वसाधारण सभा (सन 2019-20) मा.ना.संजय बनसोडे यांच्या प्रमुख नूतन ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला, तेव्हा ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर गुणवंतराव पाटील हे होते.

तर प्रमुख अतिथी श्रीमती लक्ष्मीताई चंद्रशेखर भोसले, उपसभापती श्री रामराव व्यंकटराव बिरादार, वीरशैव समाज संघटनेचे अध्यक्ष चंदर अण्णा वैजापूरे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भरतभाऊ चामले, चंद्रशेखर भोसले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रीती भोसले, उदगीर तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील व त्यांचे सर्व पदाधिकारी, बाजार समितीचे संचालक पद्माकर उगीले, संजय पवार, गजानन बिरादार, शिरीष पाटील, रमेश पाटील,धनाजी जाधव, सुभाष धनुरे, कैलास पाटील, गौतम पिंपरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संभाजी घोगरे व सर्व सदस्य तसेच गुमास्ता संघाचे अध्यक्ष विनायक चाकुरे व सदस्य व हमाल संघटनेचे अध्यक्ष भालेराव व सदस्य सर्व मापारी तसेच तालुक्यातील नवनिर्वाचीत ग्राम पंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सरपंच उपसरपंच मोठया प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित सर्व नवनिर्वाचीत 561 ग्राम पंचायत सदस्यांचा फेटा, शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ना.संजय बनसोडे यांनी संपूर्ण वर्षभरात उदगीरच्या विकासासाठी केलेल्या कामाचा आढावा मांडून या पुढेही मी कटिबद्ध असल्याचे सांगून सर्व नवनिर्वाचीतांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

स्वतःच्या कामाचा अध्यक्षीय भाषणात मा. सभापती यांनी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा सादर केला .

बाजार समितीच्या चालू योजना

1) बाजार समिती मध्ये शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना 5 रुपयात पोटभर जेवण.

2 ) बाजार समितीच्या लक्षणीय प्रगती अंतर्गत रु.14 कोटी ठेवीचा उल्लेख केला.

3) 3 कोटीचे रस्तेबांधकाम पुर्ण केल्याचे सांगितले शुध्द फिल्टर पाणी.मार्केट यार्डात नवीन विद्यूत लाईन उभारणी पूर्ण.

4 ) 5000 हजार मे टन गोदाम ,रस्ते व कंपाउंड वाल बांधकाम या करिता 7 कोटींच्या विकास कामास मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले.

5 ) शेतकऱ्याच्या गाय,म्हैस किंवा बैल आकस्मिकपने वीज पडून दगावल्यास रु 25000 हजारची नगदी स्वरूपात शेतकऱ्यास मदत करण्याचे प्रस्तावित शासनाच्या मंजुरीसाठी सादर.

6 ) शेतकरयाच्या सोयाबीनच्या गंजीस आकस्मिकपने आग लागून नुकसान झाल्यास रु. 21000 हजारची नगदी स्वरूपात शेतकऱ्यास मदत.
अशा अनेक योजना चालू केल्याचे सांगितले.

वरील सर्व योजना मंजूर करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अमित भैय्या, स्व.विलासरावजी देशमुख साहेब व मा.ना.बनसोडे साहेब यांचे खूप मोठे योगदान असल्याचे या ठिकाणी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर उगीले केले तर आभार प्रदर्शन प्रा.धनाजी जाधव यांनी केले.

कार्यक्रमाचे सर्व आयोजन भगवान पाटील, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर व त्यांचा सर्व कर्मचारी वर्ग यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here