उदगीर : 25 एप्रिल रोजी उदगीर येथील कोविड सामान्य रुग्णालयात घेतलेल्या स्वबचे नमुने तपासणीसाठी लातूर येथे पाठवले होते.
त्याचा अवहाल प्राप्त झाला असून आलेल्या अवहालात 104 व्यक्तींचे अवहाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोनामुळे 6 व्यक्तींचा आज दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. तर कोरोनावर मात केलेल्या 10 व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे.
आजपर्यंत उदगीर तालुक्यात 212 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून 7333 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाल्याची माहिती निवासी नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश हरदास यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.