दिव्यांगांना लसीकरणा साठी प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्यासोबत कुटुंबातील एका व्यक्ती चे होणार लसीकरण
लातूर : लातूर जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी १ जून आणि २ जून या सलग दोन दिवशी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
ड्राईव्ह टू दिव्यांग या विशेष मोहिमे मध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांगांना लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती सोबतच त्यांच्या घरातील एका व्यक्तीलाही लस भेटणार आहे. असल्याचे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले.
सध्या लसीकरण करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे, यामुळे दिव्यांग बंधू भगिनींना लस मिळण्यासाठी अडचण येत आहे. दिव्यांगाची सोय व्हावी याकरिता त्यांना विशेष मोहीम राबवून लसीकरण करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या या जागतिक महामारी मध्ये लसीकरण हेच प्रभावी माध्यम असून लातूर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी लातूर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण मोहिम ‘ड्राईव्ह टू दिव्यांग’ राबविण्यात येत आहे.
या अभियानात दिव्यांगांना लसीकरण केंद्रांपर्यंत आणून त्यांचे लसीकरण करून घेणे, यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत १ जून आणि २ जून या दोन दिवसांमध्ये विशेष लसीकरण मोहीम प्राधान्याने दिव्यांगांसाठी राबविली जाणार आहे.
जिल्ह्यातील दिव्यांगानी या लसीकरण मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन लसीकरणामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी यावेळी केले आहे.