यूपी धर्मांतरण प्रकरण | मूकबधिरांनी इस्लाम स्विकारल्यानंतर त्यांना दहशतवादी बनवायचे होते!

179
UP conversion case: Deaf and dumb wanted to become terrorists after converting to Islam!

लखनऊ : धर्मांतर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या उमर गौतम आणि जहांगीर आलमची एटीएस चौकशी करीत आहे. चौकशीदरम्यान दररोज नवीन खुलासे होत आहेत.

एटीएस सूत्रांच्या माहितीनुसार उमर यांनी निधीसंदर्भात काही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याचा तपास चालू आहे. याखेरीज उमर ज्या संस्थांशी संबंधित आहे त्यांचीही चौकशी चालू आहे.

चौकशीनंतर अनेक धक्कादायक माहितीची व ठिकाणांची पडताळणी केली जात आहे. यूपी एटीएस यासंदर्भात नोएडाकडूनही माहिती मिळवू शकेल. गुरुवारी एटीएसने एनसीआरच्या विविध शहरांमध्ये तपास व चौकशीही केली आहे.

आयएसआय, पाकिस्तानची गुप्तहेर संस्था, कर्णबधिर आणि मुकबधिर विद्यार्थ्यांना धर्मांतरित करण्याचे आणि नंतर दहशतवादी संघटनांमध्ये सामील करण्याचे षड्यंत्र रचले होते.

या षडयंत्रांतर्गत दहशतवादी छावण्यांमध्ये त्यांना प्रशिक्षण देण्याचीही तयारी सुरू होती. या संदर्भातील महत्वाची माहिती एटीएसच्या हाती लागण्याची माहिती समोर येत आहे.

आयएसआयच्या सुचनेनुसार विविध दहशतवादी संघटनांनीही मोठ्या संख्येने धर्मांतर करण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. हिंदू धर्मातील गरजवंत हेरुन त्यांचे अधिकाधिक धर्मांतर करण्याची योजना आखल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे हे अटक केलेल्या मौलाना उमर गौतम याच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. या व्यापक कटानुसार मुकबधीर मुलांचे इस्लाममध्ये धर्मांतर करून त्यांना कट्टरपंथी बनविण्याची योजना आखण्यात आली होती.

त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्यांना दहशतवादी संघटनांकडे पाठवायचे होते. नोएडा डेफ सोसायटीच्या काही विद्यार्थ्यांनी धर्मांतर केल्याचे स्पष्ट झाले आहे.

तथापि, संघटनेच्या पहिल्या टप्प्यात दिल्ली-एनसीआरमधील १६०० हून अधिक मूकबधिर शाळा आणि प्रशिक्षण केंद्रांना लक्ष्य केले गेले. एटीएसची टीम या सर्व ठिकाणी जाऊन शोध घेत आहे. यासंदर्भात अमर उजाला यांनी बातमी प्रसिद्ध केली आहे.

नोएडा डेफ सोसायटीच्या १६००० विद्यार्थ्यांना रोजगार प्रशिक्षण

नोएडा डेफ सोसायटीच्या संचालिका रूमा रोका यांच्या मते, ही सोसायटी २००५ पासून कार्यरत आहे आणि दोन खोल्यांच्या फ्लॅट मध्ये ही संस्था सुरु झाली होती. 16 वर्षांच्या कालावधीत देशभरातील 16,००० हून अधिक कर्णबधिर विद्यार्थ्यांना रोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील शेकडो मूक-बधिर विद्यार्थी मोठ्या औद्योगिक क्षेत्रापासून ते निरनिराळ्या संस्था व व्यक्तीकडे काम करत आहेत. आम्ही त्यांना सक्षम करण्यासाठी निःस्वार्थपणे कार्य करीत आहोत, असे संचालकांचे म्हणणे आहे.

तथापि, आम्ही काही लोकांमुळे असहाय आहोत आणि त्याच लोकांच्या चुकीच्या हेतूमुळे आम्हाला हे सर्व पहावे लागत आहे. आम्ही देशातील वंचित व दुर्बल लोकांच्या सबलीकरणासाठी कार्यरत असल्याचा संस्थेचा दावा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here