कॉलगर्ल म्हणून महिलेचा पॉर्नसाईटवर फोटो अपलोड | एकावर गुन्हा दाखल

182

कॉलगर्ल असल्याची बनावट प्रोफाइल तयार करून एका महिलेचे फोटो पॉर्नसाईटवर अपलोड करून तिचा विनयभंग केला.

याबाबत मुंबई येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित महिलेचे सोशल मीडियावर अकाउंट आहे.

त्या अकाउंटवरील फोटो आरोपीने स्क्रीनशॉट काढून घेतले. महिलेची बदनामी करण्याच्या उद्देशाने महिलेचे फोटो पाच पॉर्नसाईट आणि अडल्टसाईटवर अपलोड केले.

वेगवेगळ्या साईटवर महिलेचे नाव दिले आणि त्यावर अश्लील कमेंट्स करून महिला एक कॉलगर्ल असल्याच्या आशयाची पोस्ट केली.

याबाबत एकाच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354 (ड), 500, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (सी), 67 (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here