भामटा पत्रकार ‘राजदीप सरदेसाई’

424

भामटा पत्रकार राजदीप सरदेसाई

(वैधानिक इशारा… या लेखाच्या शिर्षकात व मजकुरात ‘भामटा’ हा शब्द ‘भामटेगिरी’ करणारा या अवगुण दर्शक अर्थाने आहे. या शब्दामुळे कोणती-जमात, समाज दर्शविण्याचा दुरान्वये संबंध नाही.)

वारंवार चुकीची, खोटी माहिती देणारा, पुन्हा पुन्हा माफी मागणारा, मान्यवरांच्या मुलाखती दरम्यान तोंडाळपणा करून शिव्या खाणारा भामटा पत्रकार राजदीप सरदेसाई विषयी लिहायला हवे असे वाटतच होते. पत्रकार म्हणून कोणतेही वृत्तांकन करताना वृत्तात नोंदवलेल्या आशयाची, स्त्रोताची खात्री करा, कोणी, कुठे, कधी, केव्हा, का आणि कशी माहिती दिली ते तपासा. नंतरच वाचक, श्रोता किंवा प्रेक्षकापर्यंत वृत्त पोहचवा हा पत्रकारितेतील बाळबोध जबाबदारीचा धडा प्रत्येक नवशिक्या पत्रकाराला शिकवला जातो. या बाळबोध जबाबदारी पासून फारकत घेणारे लिखाण आणि वक्तव्ये करीत केवळ आणि केवळ एखाद्याची ठरवून आणि पूर्वग्रह दुषित बदनामी करण्याचाच प्रयत्न करणारा राजदीप सरदेसाई जेव्हा वारंवार समोर येतो तेव्हा तो पत्रकारितेतील भामटा असल्याचे लक्षात येते.

राजदीपला भामटा म्हणताना त्याचा कोणताही इतिहास जाणून घेण्याची इच्छा नाही. कारण माणसाचे कधीकाळी केलेले कोणतेही कर्तृत्व त्याचा कायमचा चेहरा वा चारित्र्याचे प्रमाण असूच शकत नाही. तसे या भामट्या राजदीपचे आहे. माझ्यासमोर राजदीपची जी उदाहरणे आहेत ती भामटेपणाची तर आहेच पण त्यातून उथळपणा, बेफिकीरपणा, निर्लज्जपणा आणि उताविळपणा सतत समोर येतो. पत्रकार कसा असू नये याचे चपखल उदाहरण राजदीपचे आहे.
गुजरात दंगलचे वारंवार चर्चा चर्वण करणे हा माध्यमांमध्ये चाऊन, चघळून चोथा झालेला विषय आहे.

या दंगल प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यात गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विषयी कोणताही आक्षेप नोंदवलेला नाही. पण राजदीप हा मोदींचा उल्लेख नेहमी गुजरात दंगलचे दोषी याच आशयाने करतो. न्यायालयाने मोदींना दोष लावलेला नसतानाही हा राजदीप स्वतःच न्यायाधिश असल्यागत मोदींना समाज माध्यमात दोषी, आरोपी म्हणतो. अर्थातच राजदीप याच प्रवृत्तीमुळे भामटा ठरतो. कारण देशात यापूर्वी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना तत्कालिन अर्थमंत्री पी. चिदंबरम विरोधात अपहाराची याचिका नंतर न्यायालयात दाखल झाली. तेव्हा राजदीपने पी. चिदंबरम यांचा उल्लेख ‘काळा चेहरा’ असलेला नेता असा केला होता. न्यायालयाने याचिकेच्या सुनावणीनंतर चिदंबरम यांना निर्दोष ठरविले तेव्हा या भामट्या राजदीपने चिदंबरम यांची माफी मागितली होती. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर चिदंबरमसाठी एक आणि न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मोदींसाठी दुसरी भूमिका घेणारा हा राजदीप भामटा नाहीतर काय आहे ?

हा भामटा मोदींविषयी भारतात काहीही लोणकढी थापा ठोकून देतो. त्यावर मूठभर मोदी द्वेषी राजदीपची तळी उचलतात. पण हा भामटा भारताबाहेर परदेशात जाऊन जेव्हा मोदींच्या प्रतिमेवर थुंकायचा प्रयत्न करतो तेव्हा तेथे स्थिरावलेले भारतीय वंशाचे नागरिक याला धक्काबुक्की करतात. हा प्रकार न्युयॉर्कमध्ये घडला आहे. अमेरिका दौऱ्यावर असताना मोदींचे तेथे भाषण झाले. त्यानंतर मेडसन स्क्वेअर गार्डन परिसरात जमलेल्या प्रेक्षकांना डिवचणारे व मोदींची अप्रतिष्ठा करणारे प्रश्न हा भामटा विचारत होता. तेव्हा तेथील मोदी प्रेमींनी याला धक्काबुक्की केली. तो जर तेथे जास्त वेळ थांबला असता तर त्या प्रेक्षकांनी भामट्याला बुकलून काढला असता. एखाद्या भारतीय पत्रकाराची परदेशात एवढी दूर्दशा यापूर्वी कधीही झालेली नसावी. या भामट्याला बंगळुरूमधील हॉटेलातही एका भारतीयाने ‘मापात राहा’ असे सुनावले होते. तेव्हा या भामट्याला पाठिंबा द्यायला दोन-चार इतर टपोरी पत्रकार समाज माध्यमात पुढे सरसावले होते.

हैद्राबाद येथील सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी बनाव करून एन्काऊंटर केले असे कपोलकल्पित वृत्तांकन या भामट्या राजदीपने स्वतःच्या चैनलवर केल्याचा प्रकार सिद्ध झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात अक्षरशः खोटेनाटे वृत्त पसरविण्याचे पाप या भामट्याने केले होते. जेव्हा न्यायालयात या भामट्याचा खोटेपणा उघडा पडला तेव्हा या भामट्याने तीन पानी विनाशर्त माफी पत्र न्यायालयाकडे सादर केले. त्यात कबूल केले की ‘हो मी खोटी बातमी दिली आहे’. आता हेच उदाहरण याची भामटेगिरी दाखवायला पुरेसे नाही का ?

पत्रकारितेत नव्याने येणाऱ्या युवकांना मुलाखत तंत्र शिकवले जाते. ज्याची मुलाखत घ्यायची त्याला निर्भयपणे प्रश्न विचारा पण त्याचा अवमान होणार नाही, त्याच्या पदाचे अवमूल्यन होणार नाही याची काळजी घ्या असा संकेत अलिखितपणे पाळला जातो. पण भामटा राजदीप हा संकेत वारंवार पायदळी तुडवून तुसडेपणाने, मुजोरी करीत समोरच्या मान्यवरास प्रश्न विचारतो आणि नंतर अवमानाच्या थापडा कानपटात खातो. माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जीं यांना अवमान करणारा प्रश्न या भामट्याने विचारला. तेव्हा मुखर्जी यांनी त्याला मापात राहण्यासाठी शब्दांनी थप्पड लगावली. तरी हा हसत होता. राजदीप हा मोदींना गुजरात दंगलचे दोषी वा आरोपी म्हणतो. ते उत्तर द्यायला लागले की विषय बदलतो आणि पुन्हा थोबाडात खातो. राज ठाकरेंचा उल्लेख ‘भौंकते बहुत हो’ असा करतो. तेव्हा राज ठाकरेही म्हणतात, ‘तुझे भुंकणे बंद झाले का ?’ राज ठाकरे सुनावतात, ‘तू चैनल सोडून दुसऱ्या चैनलमध्ये जातो. मग मी दुसरा पक्ष काढला म्हणून का भुंकतो ?’ जेव्हा राज ठाकरे अशा प्रकारे बदाबदा कानात हाणतात तेव्हा हा भामटा निर्लज्ज होतो. हा हलकट पत्रकार विम्बल्डन विजेती भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला म्हणतो, ‘तू मुलेबाळे जन्माला घालून कधी स्थिरस्थावर होणार ?’ कर्तृत्ववान महिलेत केवळ बाळ जन्माला घालणारी महिला शोधणाऱ्या या राजदीपची नजर किती घाणेरडी आहे, हे या उदाहरणातून समजून घ्यायला हवे. या भामट्याची लायकी काहीच नाही असे जाहीरपणे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. अंबानी म्हणाले, ‘अरे भामट्या मी तुला सिरीयसली घेतच नाही.’ यावर हा राजदीप वेडपटगत स्वतःच हसतो.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भामट्या राजदीपला थप्पड लगावली होती. याच मुखर्जींच्या निधनाची चुकीची बातमी राजदीपने समाज माध्यमात प्रसारित केली होती. तेव्हा मुखर्जी यांच्या मुलांनी राजदीपच्या कृत्याचा उल्लेख ‘भारतातील खोटारडी माध्यमे’ असा केला होता. तेव्हा निर्ल्लजपणे राजदीपने माफी मागितली होती. हा भामटा राजदीप राष्ट्रपतींचा अवमान आजही करतो. अलिकडे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या तैलचित्राचे अनावरण केले. कोण्या अर्धवट बाईमाणसाने ते तैलचित्र बोस यांची भूमिका केलेल्या अभिनेत्याचे आहे असा दावा केला. भामट्या राजदीपने त्याची शहानिशा न करता तोच दावा समाज माध्यमात पसरवला. नंतर समोर आले की, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित परेश मायटी या चित्रकारांनी मेहनत घेऊन व बोस यांच्या परिवाराशी बोलून ते चित्र चितारले आहे. हे स्पष्ट झाल्यानंतर या भामट्या राजदीपने ट्विटरवरील प्रतिक्रिया काढून टाकली. पण अजूनही राष्ट्रपतींची माफी मागितली नाही. शेवटी राष्ट्रपती भवनातून याच्या मालकाला समज देणारे पत्र पाठवले गेले आहे.

राजदीपची भामटेगिरी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या हिंसक वळणावर उघडी पडली. पंजाब, हरियाणाकडील शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रैक्टर मोर्चा काढला. हा मोर्चा लालकिल्ला परिसराकडे गेला. मोर्चात सहभागी ट्रैक्टर चालक काय करीत होते ? यावर भाष्य करायचे नाही. पण ट्रैक्टरची पळवापळी सुरू असल्याचे काही तुकड्यांमधील चलचित्रण समाज माध्यमात प्रसारित झाले आहे. अशाच एका घटनेत ट्रैक्टर उलटला आणि चालकाच्या मेंदूला गंभीर जखम होऊन तो मृत झाला. राजदीपच्या एका मित्राने हा प्रकार पोलिसांच्या गोळीबारात एक ठार अशी लोणकढी थाप ठोकून देत समाज माध्यमात पसरवलला. भामट्या राजदीपनेही तथ्य न तपासता ते वृत्त तसेच प्रसारित केले. ही थाप वाचून महाराष्ट्रातील काही ‘शिपाई’ चवताळले. म्हणाले ‘मोदीने दिल्लीत शेतकऱ्यावर गोळीबार केला’ असा प्रचार करण्यात कोण पुढे होते ? तर ज्यांच्या नेत्यांनी मावळमध्ये गोळीबार केला, ज्यांनी नागपुरात गोवारींना चिरडले तेच शिपाई बोंबलत होते. भामट्या राजदीपने या उताविळ शिपायांना तोंडघशी पाडले. नंतर जेव्हा घडलेल्या प्रकाराची चित्रफित समोर आली तेव्हा भामट्या राजदीपने माफी मागितली.

राजदीप प्रवृत्तीने तसा कुत्र्याच्याही प्रवृत्तीचा आहे, हे लक्षात घ्यायला एक उदाहरण समोर आहे. समाज माध्यमात नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘नमो’ आणि राहुल गांधींचा उल्लेख ‘रागा’ म्हणून होतो. या भामट्या राजदीपने कुत्र्याचे नाव ‘नेमो’ ठेवले आहे. राजदीप म्हणतो, ‘जर नमो देश चालवत असतील तर मी माझ्या नेमोला बागेत चालवतो.’ हा राजदीप भामटा भारताच्या पंतप्रधानाला त्याच्यावर केलेल्या आरोपाच्या उत्तरात बोलू देत नाही. पुलवामात भारतीय सैन्यदलाच्या गाडीवर हल्ला चढवून सैनिक ठार मारल्याच्या डिंग्या पाकिस्तानी संसदेत मारणारा पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरीला चैनलवर चर्चेला बोलावून ‘हां बोलो चौधरीसाहब’ असे हा भामटा म्हणतो. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना याच राजदीपला पद्मश्री पुरस्कार दिला गेला आहे. या उपकाराची जाणीव भामट्या राजदीपला आहे.
राजदीप सरदेसाईच्या भामटेपणाचे आणि पत्रकारितेत कोलांट उड्या करीत शेण खाल्ल्याची अनेक उदाहरणे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. राजदीप प्रमाणेच उलटेपालटे होऊन शेण खाणारी काही भामटी मंडळी मराठी पत्रकारितेतही आहेत. कधी तरी तिकडेही नजर टाकू या …

(भामट्या राजदीपसाठी येथे विनाकारण शब्दबंबाळपणा करणे गरजे गरजेचे नाही.)
भामटा शब्दाविषयी स्पष्टीकरण
लेखकाला अपेक्षित अर्थ …
महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | Word or Phrase
मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi
प्रचलीत अर्थ – उचल्या, भुट्टेचोर, नकळत चोरी करणारा, लबाड, कारस्थानी माणूस.
उचल्या, चोर, चोरटा, फसवून चोरी करणारा, भुरटा चोर, कारस्थानी, लबाड, लुच्चा.
लेखकाला भामटा या जमातीविषयी आदर असून त्यांच्या अवमानाचा हेतू नाही.
भामटा एक जमात. (भामटी ही सैनिक जमात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत इतर विमुक्त भटक्या जमातींप्रमाणे भामटी जमातीचेही मोठे योगदान आहे. सैनिक म्हणून ते लढले. उत्तर पेशवाईपर्यंत त्यांची कामगिरी सुरू होती. राजस्थानातील भामटा प्रांतातून हा समाज महाराष्ट्रात आला म्हणून या समाजाला भामटी असे नाव पडले. राजपूत राजाकडे सैनिकी करीत असताना अकबराच्या आक्रमणामुळे अनेक सैनिकी जमाती पोटासाठी महाराष्ट्रात आल्या…. लेखकाला या जमातीविषयी पूर्णतः आदर आहे.)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here