अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat Bold And Hot Photo) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वनिता खरात तिच्या न्यूड फोटोशुटमुळे चर्चेत आली होती. आता वनिताने आणखी एक बोल्ड आणि हॉट असा फोटो शेअर केला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची विजेती असलेली वनिता (Vanita Kharat) सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या न्यूड फोटोशूटची प्रचंड चर्चा झाली होती.
त्यानंतर आता तिने आणखी एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. वनिताचा हा नवीन बोल्ड फोटोदेखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
वनिताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक बोल्ड आणि अगदी हॉट असा फोटो शेअर केला आहे. या फोटोत वनिताने डिप नेकचे जॅकेट घातले आहे.
त्यावर गळ्यात मोठी चेन घातली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या या फोटोतील तिचा लूक अतिशय मादक आणि घायाळ करणारा आहे. तिच्या नजरा चाहत्यांना पूर्णपणे घायाळ करतील यात शंकाच नाही.
वनिता खरातने दोन फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोवर अनेक प्रतिक्रिया आहेत. अनेकांनी तिच्य़ा या फोटोला हॉट अंदाज म्हणून कौतुक केले आहे. तर काहींना असा फोटो टाकणे बरे नव्हे असे म्हणत या फोटोला नाकारले.
या अगोदर 1 जानेवारी रोजी वनिता खरातने न्यूड फोटो शेअर केलेला. या फोटोमुळे ती खूप चर्चेत आली. अभिनेता शाहिद कपूरच्या ‘कबिर सिंह’या सिनेमात वनिता खरातने ‘पुष्पा’ या मोलकरणीची भूमिका साकारली होती. पुष्पाचं हे पात्र अतिशय लोकप्रिय असून ते प्रेक्षकांच्या मनात घरं करून आहे.