पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोठी यांच्या सभेदरम्यान मिथून चक्रवर्ती यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यशस्वी अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा आता राजकीय प्रवास सुरु झाला आहे.
मात्र आपल्या फिल्मी करिअरमध्येही त्यांनी अनेक चढउतार पाहिले. काही हिट चित्रपट दिल्यानंतर त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉपच्या यादीत जमा झाले होते, मात्र यामुळे त्यांचे स्टारडम मुळीच कमी झाले नाही. चित्रपट करिअर आणि खासगी आयुष्यात त्यांनी काही असे निर्णय घेतले ज्यामुळे त्यांचे चाहते हैराण झाले होते.
एक नजर टाकुयात मिथूनदांच्या आयुष्यावर
-
विवाहित असूनही श्रीदेवीसोबत केले होते दुसरे लग्न
16 जून, 1950 ला कोलकातामध्ये मिथून चक्रवर्ती यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. हे नाव त्यांनी कधीच चित्रपटांसाठी वापरले नाही. त्यांनी स्वबळावर इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
त्यांनी चित्रपट करिअरची सुरुवात 1976 मध्ये आलेल्या ‘मृगया’ चित्रपटातून केली. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. ते यशस्वी अभिनेता झाल्यानंतर त्यांचे नाव त्यांच्या को-स्टार रंजीता, योगिता बाली, सारिका आणि इतर अभिनेत्रींसोबत जोडले गेले. परंतू त्यांच्या श्रीदेवीसोबतच्या अफेअरची चर्चा सर्वात जास्त रंगली.
1984 मध्ये ‘जाग उठा इंसान’ मध्ये श्रीदेवी आणि मिथून यांनी पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. मिथून दांनी एका मुलाखतीत स्वतः कबूल केले होते की, त्यांनी श्रीदेवीसोबत गुपचुप लग्न केले होते.
रिपोर्ट्सनुसार, 1984 साली रिलीज झालेल्या ‘जाग उठा इंसान’ या सिनेमाच्या शूटिंग सेटवर मिथून आणि श्रीदेवी यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. या दोघांनी गुपचुप लग्न उरकल्याचीही त्यावेळी जोरदार चर्चा रंगली होती. इतकेच नाही तर एका मॅगझिनने मिथून आणि श्रीदेवी यांचे मॅरेज सर्टिफिकेट प्रकाशित केल्यानंतर मिथूनदांनी लग्नाची कबुली दिली होती.
-
एकामागून एक फ्लॉप झाले होते 33 चित्रपट
1993 ते 1998 हा मिथून चक्रवर्ती यांच्या करिअरमधील सर्वात वाईट काळ होता. याकाळात त्यांचे चित्रपट एकामागोमाग फ्लॉप होत होते. या काळात त्यांचे लागोपाठ 33 चित्रपट फ्लॉप ठरले होते. तरीही त्यांचे स्टारडम टिकून होते. त्यावेळी त्यांना 12 चित्रपट साइन केले होते.
-
नक्षली ते सिनेमापर्यंतचा प्रवास
खुप कमी लोकांना माहिती असेल की, मिथून चित्रपट उद्योगात प्रवेश करण्यापुर्वी कट्टर नक्षली होते. कौटूंबिक अडचणींमुळे त्यांनी आपला रस्ता बदलला आणि आपल्या कुटूंबामध्ये परत आले.
एका अपघातात त्यांच्या एकुलत्या एक भावाचा मृत्यू झाला होता. यानंतर मिथून दांनी स्वतःला नक्षली आंदोलनापासून दूर केले.
-
350 चित्रपटांमध्ये केले काम
मिथून बॉलिवूडमधील अशा व्यक्तींपैकी एक आहेत, ज्यांना कोणतेही फिल्मी बॅकग्राउंड नव्हते. इंडस्ट्रीमध्ये त्यांचा कुणी गॉड फादर नव्हता. त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केली.
कोलकाताच्या प्रसिध्द स्कॉटिश चर्च कॉलेजमधून मिथून यांनी केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्यूएशन केले. चित्रपटात येण्यासाठी त्यांना पुणे फिल्म संस्थानमधून एक्टिंगचा कोर्स केला. आतापर्यंत त्यांनी 350 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे आणि आताही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत.
त्यांनी ‘वारदात’, ‘अविनाश’, ‘जाल’, ‘डिस्को डांसर’, ‘भ्रष्टाचार’, ‘घर एक मंदिर’, ‘वतन के रखवाले’, ‘हमसे बढ़कर कौन’, ‘चरणों की सौगंध’, ‘हमसे है जमाना’, ‘बॉक्सर’, ‘बाजी’, ‘कसम पैदा करने वाले की’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘स्वर्ग से सुंदर’ सारख्या चित्रपटात काम केले आहे.
-
कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक
अभिनेता असल्यासोबतच मिथून ‘मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्स’चे मालकही आहेत. त्यांचे तामिळनाडुच्या ऊटी, मसिनागुडी आणि कर्नाटकच्या मैसूर येथे अनेक हॉटेल्स आहेत.
मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या ऑफिशिअल वेबसाईटवरील उपलब्ध माहितीनुसार, उटीमधील हॉटेल्समध्ये 59 रुम्स, 4 लग्जरी सुईट्स, हेल्थ फिटनेस सेंटर, इनडोर स्विमिंग पूल, लेसर डिस्क थिएटर, मिड नाइट काउ ब्वॉय बार, डिस्को सोबत किड्स कॉर्नर यांसारख्या सुविधाही आहेत.
मसिनागुडी येथील हॉटेलमध्ये 16 एसी बंगले, 14 ट्विन्स मचांस, 4 स्टैंडर्ड रूम, मल्टीकुशीन रेस्तरॉ आणि चिल्ड्रेन प्ले ग्राउंड सोबत हॉर्स राइडिंग आणि जीप जंगल राइड यांसारख्या सुविधा आहेत.
मसुरी येथील हॉटेलमध्ये 18 वेल फर्निश्ड एसी कॉटेज, 2 एसी सुइट्स, ओपन एयर मल्टीकुशीन रेस्तरॉसोबत स्विमिंग पूल, पूल टेबल आणि ट्रेवल रिलेटेड सर्विसेस आहेत.