Video Viral | क्लासरुममध्येच अल्पवयीन जोडप्याने ‘शुभमंगल’ उरकले !

214
Video Viral young couple left 'marrage' in classroom!

महाविद्यालीन किंवा शाळा शिकण्याच्या वयात प्रेमात पडणं हे आता नवं नाही, प्रेम विवाह करणे देखील नवीन राहिले नाही.

मात्र वर्गामध्येच लग्न उरकून त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार आंध्रप्रदेशात उघडकीस आला आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी सदर प्रकाराची चौकशी सुरु केली आहे. प्रेमानंतरची पुढची पायरी म्हणजे लग्न मात्र ही पायरी गाठण्यासाठी स्त्री आणि पुरुषांना कायद्याचे बंधन आहे.

काही वेळी प्रेमात पडलेली मुलं-मुली कायद्याचे हे बंधन पाळत नाहीत. सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने आणि मुलीने वर्गातच लग्न केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या राजमहेंद्रमधील एका ज्युनिअर वर्गात हा सर्व प्रकार घडला.

या प्रकरणातला मुलगा 17 वर्षाचा असून त्याने त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि तिच्याबरोबर लग्न केले.

त्या दोघांनी नंतर लग्नाचा एकत्र फोटो देखील काढला. या लग्नाला त्यांच्या वर्गातले मित्र देखील उपस्थित होते. या ‘समारंभास‘ विद्यार्थ्यांमधील एकाने या लग्नाचा व्हिडिओ शूट केला आणि मित्रांमध्ये व्हायरल केला.

लग्न करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन मुलांवर कॉलेज प्रशासनाने कारवाई केली असून त्यांना कॉलेज सोडून जाण्यास सांगितलं आहे.

आंध्र प्रदेशच्या महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून दोन्ही अल्पवयीन मुलांना कौन्सलिंगसाठी पाठवण्यात आलं आहे.

मुलीच्या घरच्यांनी तिला स्वीकारण्यास देण्यास नकार दिल्याने महिला आयोगाने मुलीला तात्पुरता आश्रय दिला आहे.‘कॉलेजच्या वर्गात लग्न करण्यासाठी मुलांना कुणी संरक्षण दिलं?’ याचा पोलीस सध्या तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here