हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही | राहूल गांधी

201

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब-हरियाणा शेतकऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनाच्या सहनशिलतेचा बांध फटलेला आहे.

आंदोलनला हिंसक वळण मिळालेलं असून तोडफोड आणि पोलिसांचा लाठीचार्ज अशा घटना घडलेल्या आहेत.

त्यावर काॅंग्रेसचे नेते राहूल गांधींनी ट्विट करून शांततेचं आवाहन केलं आहे.

राहूल गांधी यांनी म्हटलेलं आहे की, “हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही.

जखम कुणालाही होवो, नुकसान आपल्या देशाचच आहे.

देशाविरोधातील कृषी कायदे मागे घेण्यात यावेत”, अशा आशयाचे ट्विट राहूल गांधींनी केले आहे.

मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन उग्र रुप धारण केले आहे.

केंद्राच्या विरोधात आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे.

राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास परवानगी मिळाली होती. मात्र, नंतर आंदोलनाला हिंसक वळण मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here