कुठल्यातरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं? हे चुकून इकडं आले | नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

239

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी कार चालवणं सोपं असतं. कारण, मुख्यमंत्री आल्यानंतर ट्रॅफिक थांबलेलं असतं. पण, इथं समस्यांचा ट्रॅफिक सुरु असते. 

त्यावेळी, कोणी मित्र ब्रेक लावतात, कोणी एक्सीलेटर वाढवतात, मग कुणी आपल्याच हातात स्टेअरिंग असल्याची घोषणा करते, असे म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्टेअरिंग विधानावर पलटवार केलाय.

‘स्टेअरिंग माझ्याकडे आहे, हे आम्हाला सांगून काय फायदा?, ते जे सांगत आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला. कोणाच्या हातात स्टेअरिंग आहे, कोणाकडे ब्रेक आहे, कोणाकडे एक्सिलेटर आहे, हे जगाला माहिती आहे.

कोण कधी ब्रेक लावतं, कोण एक्सिलेटर वाढवतं. खरं म्हणजे मुख्यमंत्री म्हणाले माझ्या हातात कार आणि सरकार दोन्ही आहे. कारचे स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे, हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगायची गरज नाही.

मुख्यमंत्री सत्तेत सोबत बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ते सांगत असतील. जनतेला माहीत आहे कोणाच्या हातात काय आहे, असे फडणवीस यांनी हल्ला चढवत म्हटले आहे.

कारचे स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे, हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगायची गरज नाही. ते सगळं सत्तेत सोबत बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ते सांगत असतील. जनतेला माहीत आहे कोणाच्या हातात काय आहे. @Dev_Fadnavispic.twitter.com/uM5z6nqTv9

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 20, 2021

मी कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित चालवतो. माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

घरातून बाहेर न पडणारे मुख्यमंत्री अशी टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिले होते.

सरकार व विरोधकांबद्दल प्रवासात मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत. पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, असं सूचक बोलताना म्हटले होते,

मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचे आता अनेक अर्थ काढले जात आहेत. मात्र, हे विधान त्यांच्या मित्र पक्षांसाठीच असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

खासदार नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर शाब्दीक प्रहार 

उद्धव ठाकरेंनी लाचारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवल आहे. आज टीपू सुलतानची जयंती साजरी करतायंत. आम्ही होतो ती शिवसेना वेगळी होती, ही शिवसेना वेगळी आहे.

मुख्यमंत्री म्हणून सरकारी यंत्रणा हाताळण्याचं काम त्यांच्याकडे नाही, त्यांना ना खड्डे माहितीय, ना तिजोरी माहिती आहे. नुसत्या घरी बसून गप्पा सुरु आहेत.

गाडी कशी चालवायची माहिती असेल, पण सरकार कसं चालवायचं याचा अभ्यास नाही, असे म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर चौफेर हल्ला चढवत टोला लगावला.

शरद पवार आहेत म्हणून मी शब्द वापरत नाहीत. हे सरकार म्हणजे शरद पवार सोडून ही सगळी नौटंकी आहे, असे म्हणत शरद पवार यांच्याविरोधात बोलणं नारायण राणेंनी टाळले.

उद्धव ठाकरेंचा मंत्र्यांवर अंकुश नाही, सरकारमधील शिवसेना केवळ कलेक्शनसाठी फिरतेय. दुसरीकडे, सरकारकडे पैसे नाहीत, म्हणून जिल्हा नियोजनसाठी जिथं 142 कोटी रुपये मिळायचे तिथं यंदा केवळ 42 कोटी मिळाले.

त्यातही, 50 टक्के कोरोनासाठी. म्हणजे, 21 कोटी रुपयांत सगळा कारभार करायचा, हे यांच सरकार. म्हणे हातात स्टेअरिंग आहे, कशाचं स्टेअरिंग.

खरं म्हणजे चुकलंय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी यायचं की, कुठल्यातरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं? हे चुकून इकडं आलेत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या स्टेअरिंगवरील वक्तव्यावरुन नारायण राणेंनी जहरी टीका केलीय.

महाविकास आघाडीचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं करु शकत नाही

‘शरद पवार आणि मुख्यमंत्री दोघंही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात जाणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे यासाठी मोदींनी कृषी विधेयक आणलं आहे.

त्याला हे विरोध करतायेत हे राजकीय आंदोलन आहे, असं राणेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं कोणतही काम महाविकास आघाडीचं सरकार करु शकत नाही. कारण यांच्या तिजोरीत पैसेच नाहीत.

आज सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. एसटीचे पगार दोन-तीन महिने होत नाहीयेत. आज सरकारची अवस्था डबघाईला आली आहे. आधी त्यांनी ती सुधारावी नंतर त्यांनी रस्त्यावर यावे.

किमान मातोश्रीच्या बाहेर मुख्यमंत्री पडतील आणि आमचा मुख्यमंत्री असा आहे हे लोकं बघतील तरी, असं टोला राणेंनी लगावला आहे.

यापूर्वी शरद पवार हेच विधेयकासाठी प्रयत्न करत होते. शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विकायची परवानगी आहे. मग विरोध कशाला.

धान्य आणि भाज्या मातोश्रीत नेऊन विकायच्या का? तो दरवाजा, पिंजरा बंदच असतो. मग विकायचा कुठे?, असा सवालच नारायण राणे यांनी केला आहे.

औरंगाबादचं संभाजीनगर जाहीर करायचं सोडून टिपू सुलतानची जयंती साजरी करत आहेत. ही शिवसेना नाही. आम्ही होतो ती वेगळी आणि आत्ताची शिवसेना वेगळी आहे, असंही ते म्हणाले आहेत.

बाळासाहेब वरुन पाहत असतील तर अशा पुत्राला काय म्हणत असतील, असं म्हणत नारायण राणेंनी औरंगाबाद नामांतरावरून ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

औरंगाबादमध्ये संभाजीनगर म्हणून बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं. मुलगा मुख्यमंत्री असताना त्याची पूर्तता होत नाही हे दुर्दैव आहे. साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रीपद मोठं वाटते.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here