वॉर्नर ‘सेक्स’मुळे दुखापतग्रस्त झाला असावा | पत्नीने ऑस्ट्रेलियाची माफी मागितली !

388

सेक्समुळे (Sex) वॉर्नरच्या ग्रॉईनवर ताण पडला की काय अशी शंका व्यक्त केली.

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) हा भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता.

त्याचा मांडीचा स्नायू ( groin) दुखावल्यामुळे त्याला तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय तसेच संपूर्ण टी-२० मालिकेला मुकावे लागणार आहे.

याचबरोबर जर तो लवकर दुखापतीतून सावरला नाही तर त्याच्या कसोटी मालिकेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकते.

दरम्यान, वॉर्नरची पत्नी (candice) आपला पती डेव्हिड वॉर्नरला दुखापत का झाली याचे कारण सांगितले. तिने अनेक महिन्यानंतर वॉर्नर घरी आल्यानंतर आम्ही सगळे कपल जे करतात तेच केले असे सांगत वॉर्नरच्या दुखपतीला आपणही हातभार लावल्याचे गंमतीने म्हटले.

सेक्स करताना स्नायू दुखावू शकतो का?

वॉर्नरची पत्नी कँडसीने एका रेडिओ शो मध्ये ‘आम्ही चार महिन्यानंतर एकत्र आलो आणि काही दिवस जे सगळे करतात तेच केले.

अरे बापरे मी त्याच्यासोबत काय केले? असे गंमतीने म्हणत सेक्समुळे (Sex) वॉर्नरच्या ग्रॉईनवर ताण पडला की काय अशी शंका व्यक्त केली.

तिने हे उत्तर निवेदनकर्ती लॉरेन्स मुनी हिने तिला वॉर्नरचा मांडीचा स्नायू दुखावल्यापासून सगळे तुझ्याकडेच उंगलीनिर्देश करत आहेत असे म्हटल्यानंतर दिले. याचदरम्यान कँडसीने गंमतीने ऑस्ट्रेलियाची माफीही मागितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here