वाशिममध्ये एकाच शाळेतील 229 विध्यार्थ्यांना कोरोनाची लागण | राज्यात दुसऱ्या दिवशी कोरोनाचे आठ हजाराहून नवे रुग्ण

165
ll the schools of Aurangabad city will be closed ordered municipal corporation commissioner

मुंबई: वाशिममध्ये एका शाळेतील 229 विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आवश्यक वाटल्यास एक मार्चपासून राज्यातील शाळा बंद करण्यात येतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

त्याचसोबत सातारा जिल्ह्यातील 16 शाळांमधील 35 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने इतर सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. 

राज्यात गेल्या चोवीस तासात सलग दुसऱ्या दिवशी आठ हजाराहून जास्त कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये सर्वाधिक वाढ महाराष्ट्रात दिसून येत आहे.

राज्यात गुरुवारी 8,702 नव्या रुग्णांची भर पडली आहे. या आधी बुधवारी 8,807 कोरोना रुग्णांची भर पडली होती.राज्यात एकूण कोरोनाची रुग्णसंख्या ही आता 21,29,821 वर पोहचली आहे.

गुरुवारी एकूण 56 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या आता 51,993 इतकी झाली आहे. गुरुवारी राज्यात 3744 रुग्ण बरे झाले, त्यामुळे आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 20,12,367 इतकी झाली आहे. महाराष्ट्रात आता एक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 64,260 इतकी झाली आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन न होता मोठे कार्यक्रम केले जात आहेत. त्याचा परिणाम कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.

मागील काही दिवसात देशात आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने भर पडत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं जातंय.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here