बॉलिवूडची फिल्मसिटी घेऊन जाण्याचा काही प्रश्नच नाही. फिल्मसिटी ही खुली प्रतिस्पर्धा आहे.
मुंबई : आम्ही काहीही घेऊन जाण्यासाठी येथे आलो नाही. आम्ही नवीन फिल्म सिटी बनवत आहोत. एखाद्याला याची चिंता का होत आहे?
आम्ही जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधांच्या रूपात लोकांना काहीतरी नवीन देत आहोत, असे उत्तर प्रदेशचे मुखख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी पत्रकारांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या फिल्म सिटी बद्दलच्या वक्तव्याबद्दल विचारले असता त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी नोएडामध्ये १ हजार हेक्टरवर नवी फिल्मसिटी उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
काल रात्री योगी आदित्यनाथ मुंबईत दाखल झाले आहेत. एका हॉटेलमध्ये त्यांची बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने भेट घेतली. बॉलिवूडची फिल्मसिटी घेऊन जाण्याचा काही प्रश्नच नाही. फिल्मसिटी ही खुली प्रतिस्पर्धा आहे.
प्रत्येक राज्याला प्रगती करण्याचा हक्क आहे. आम्ही जागतिक सुविधा देणारी नवी फिल्मसिटी उभारणार आहोत. त्यामुळे इतरांनी चिंता करण्याचे कारण नाही, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेला लगावला आहे.
- Crime News | नराधम आरोग्य अधिकाऱ्याने असहाय्य विधवा महिलेवर बलात्कार, नंतर मुलीचाही केला विनयभंग!
पुढे बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, उत्तर प्रदेशात गुंतवणूक करणाऱ्यांशी गेल्या दोन दिवसांत चर्चा केली आहे. गुंतवणूकदार उत्तर प्रदेशात आणखी गुंतवणूक करण्यास इच्छुक असून जागतिक दर्जाच्या सुखसोयी देणाऱ्या फिल्मसिटीच्या निर्मितीसाठी अनेकांशी चर्चा झाली.
कोरोना काळात देखील उत्तर प्रदेशात गुंतवणुकीत चांगली वाढ झाली आहे. यासोबतच कायदा-सुव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे उत्तर प्रदेशात उद्योगांना चालना मिळेल. असंही ते पुढे म्हणाले.