जगाला हादरवून सोडणारा करोनाचा नवा अवतार नेमका काय आहे? पुन्हा लॉकडाऊनचा धोका?

273
coronavirus-cases-in-india-

कोविड-19 शी (coronavirus) यशस्वी लढा देत असताना आता कोरोनानंं धारण केलेलं नवं रूप (mutation) नवीच डोकेदुखी बनून समोर येतं आहे.

हा नव्या रूपातला कोरोनाव्हायरस अधिक धोकादायक आहे का? (New CoronaVirus Strain Worse)  असं विचारलं जात आहे.

यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जगभरात पुन्हा कडक निर्बंध लादले जात आहेत. महाराष्ट्रातही  कोरोनाचा हा नवा अवतार (Covid 19 New Strain) अधिकच घातक आणि संसर्गजन्य असल्याचं वास्तव अजूनच चिंता वाढवणारं आहे.

विशेष म्हणजे मागील काही काळातच तब्बल बारा वेळा या विषाणूनं आपलं रुप बदललं आहे. या नव्या रुपावर लस किती प्रभावी ठरेल याबाबत शास्त्रज्ञ साशंक आहेत.

आग्नेय ब्रिटनमध्ये सापडलेलं हे कोरोनाचं नवं म्युटेशन (mutant coronavirus strain uk) सापडलं आहे. ब्रिटन सरकारनं या नव्या अवताराचा प्रसार अधिक वेगानं होत असल्याचं सांगत १६ डिसेंबरपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या नव्या म्युटेशनमुळे कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढू शकण्याचा इशाराही या सरकारने दिला आहे.

हा नवा अवतार कुठून आला आहे हे सध्या तरी समजणं अवघड आहे. इंग्लंडमध्ये डिसेंबर महिन्यात संसर्गित झालेले बहुतांश रुग्ण याच प्रकारच्या विषाणूनं बाधित झालेले आहेत.

म्युटेशन म्हणजे काय?

म्युटेशन म्हणजे वायरसच्या जेनेटिक सिक्वेन्समधला बदल. सार्स COV – 2 अर्थात कोरोना हा आरएनए वायरस आहे. त्याचे रेणू ज्या क्रमात रचलेले असतात त्या संरचनेत इथे बदल होतो.

या नव्या व्हायरसवरच्या स्पाइक प्रोटिनची रचना बदलेली आहे. या स्पाइक प्रोटिनद्वारे व्हायरस मानवी पेशींमध्ये प्रवेश करतो. हा 40 ते 70% जास्त संसर्गजन्य असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

काही तज्ञांच्या मते, मात्र कोरोना किंवा कुठलाही व्हायरस रुप बदलत राहणारच. हे व्हायरस नष्ट होतील की तसेच जिवंत राहतील हे मानवी प्रतिकारशक्तीवर हे अवलंबून असेल.

शास्त्रज्ञांना अशीही भिती वाटते आहे, की कोट्यवधी लोकांनी लस घेतल्यानंतर अजूनच प्रभावीपणे रूप बदलण्यासाठी कोरोनाव्हायरस प्रवृत्त होऊ शकतो.

शिवाय म्युटेशनमध्ये स्पाइक प्रोटिनच्या संरचनेत एका विशिष्ट जागी बदल होतो आणि लस मात्र स्पाइक प्रोटिनच्या विविध भागांवर मारा करते, असंही काही तज्ञांचं मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here