लाँग टर्म कोविड म्हणजे काय? कोरोनाच्या नव्या रुपाची लक्षणे माहिती आहेत का ? याबद्दल जाणून घ्या!

310
latur - jalkot-coronavirus-positive-cases-

नवी दिल्ली : कोरोनाचे भयावह संक्रमण देशात पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. देशात पुन्हा एकदा चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. (What is a Long Term Covid?)

कोरोना संदर्भात अलिकडेच समोर आलेला एक रिपोर्ट सध्या आपल्या चिंतेत आणखी भर घालू शकतो. कारण आपण कोरोनाच्या जाळ्यात अडकल्यावर त्यातून बाहेर पडल्यानंतर दिसणारे परिणाम दूरोगामी आहेत.

मात्र, आपल्याला या विषयी पुरेशी आणि नीट माहिती असणे आवश्यक आहे. कोरोना संदर्भात प्रकाशित झालेल्या एका नव्या अहवालानुसार, कोविडच्या संक्रमणातून बरे झाल्यावर देखील कोरोनाची लक्षणे तब्बल तीन महिन्यांपर्यंत रुग्णाच्या शरीरात राहतात. त्यामुळे कोरोना आपल्यासाठी काळजी वाढवणारा ठरत आहे.

NICE अर्थात National Institute for Health and Care च्या एका रिपोर्टनुसार, कोरोनाच्या या नव्या रुपाचा आता शोध लागला आहे. या रुपाला ‘लाँग टर्म कोविड’ या नावाने ओळखले जाते.

कोरोना बाधित रुग्ण आठ दहा दिवसांत बाहेर फिरत असेल तर तो कोरोना कॅरिअर म्हणून फिरत आहे, असा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.

लाँग टर्म कोविड काय आहे?

लाँग टर्म कोविड एक अशी अवस्था आहे, ज्यामध्ये बाधित रुग्ण कोरोनाच्या संक्रमणापासून बरा झाल्यावर देखील आणि त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यावर देखील त्याच्यामध्ये अनेक आठवड्यांपर्यंत अथवा महिन्यांपर्यंत कोरोनाची लक्षणे राहू शकतात.

कोविड संक्रमितांमध्ये 100 हून जास्त लक्षणे

एका रिपोर्टनुसार कोरोना संक्रमितांमध्ये दीर्घकालिक कोविड लक्षणे आठवडे आणि महिन्यामध्ये वेगवेगळी दिसू शकतात. एका रिपोर्टनुसार 5163 अशा लोकांशी चर्चा केली गेली जे प्रदीर्घ काळापासून आजारी होते.

यामधील 75 टक्क्यांहून अधिक लोक कोरोना पॉझिटीव्ह होते अथवा लक्षणांच्या आधारावर डॉक्टरांनी त्यांना डायग्नोस केले होते. या संशोधनानुसार, रुग्णांना लाँग कोविडच्या प्रकोपादरम्यान 100 हून अधिक लक्षणांचा सामना करावा लागू शकतो असे आढळून आले आहे.

मात्र, ही सर्व लक्षणे कोरोनाशी निगडीतच असतील असे नाही. एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, या दोन्हींच्या खात्रीसाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

काय आहेत याची लक्षणे

  • थकवा
  • श्वास घेण्यास त्रास
  • चिंता आणि नैराश्य
  • धडधड
  • छातीत दुखणे
  • सांधेदुखी आणि स्नायूंमध्ये वेदना
  • लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता ‘Brain Fog’

12 आठवड्यांहून अधिक काळ दिसू शकतात लक्षणे

नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर हेल्थ एँड केअरच्या एका रिपोर्टनुसार, कोविडच्या रुग्णांमध्ये निगेटीव्ह रिपोर्ट येऊनही 12 आठवड्यांहून अधिक काळ कोरोनाची लक्षणे दिसून येतात.

तर दुसऱ्या बाजूला ऑफिस फॉर नॅशनल स्टेस्टीस्ट (ONS) च्या एका रिसर्चनुसार, प्रत्येकी 10 पैकी एका रुग्णामध्ये 12 आठवड्यांपर्यंत अथवा त्याहून अधिक काळ कोरोनाची लक्षणे दिसून येतात.

याचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी लाँग कोविडची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची दोन गटात विभागणी केली आणि त्यांनी याबाबतचा अभ्यास केला. त्यानुसार, एका गटातील लोकांना फक्त श्वासोच्छवासासंबंधी लक्षणे होती.

जसे की, खोकला, श्वासोच्छवासास त्रास होणे, त्याचप्रमाणे थकवा, धाप लागणे आणि डोकेदुखी. तर दुसऱ्या गटामधील लोकांमध्ये शरीराच्या इतर अंगांच्या त्रासाबद्दल तक्रारी होत्या जसे की, हृदय, मेंदू यांच्यासंदर्भातील लक्षणे.

या अभ्यासामध्ये 4,182 रुग्णांना हृदयासंबंधी लक्षणे आढळली होती, जसे की छातीत धडधड आणि लक्ष केंद्रीत करण्यास असमर्थ वाटणे इ.

लाँग कोविड किती काळ राहू शकतो?

याबाबत सध्या कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाहीये. कारण याबाबतचा सविस्तर अभ्यास सध्या सुरु आहे.

लाँग कोविड किती काळ कोणत्या रुग्णांमध्ये राहू शकतो तसेच कसा परिणाम करु शकतो याबाबत सध्या उभ्यास सुरु आहे.

आठवड्यांमध्ये बदलतात लक्षणे

इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये असोसिएट रिसर्च प्रोफेसर नताली लँबर्ट यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या सुरवातीच्या फ्लू दरम्यान संक्रमितांमध्ये थकवा, डोकेदुखी, ताप आणि थंडी वाजणे, उलटीसारखी सामान्य लक्षणे दिसू शकतात.

मात्र आठवड्यानंतर याचे रुप भयानक होते. त्यानंतर कन्फ्यूजन, ब्रेन फॉग, सांधेदुखी आणि ऑक्सिजनची कमतरता यासांरखी गंभीर लक्षणे दिसू लागतात. 15 दिवसांनंतर हाय-लो ब्लड प्रेशर, हर्ट रेट वाढणे, शुद्ध हरपणे, चक्कर येणे यासारंखी लक्षणे दिसू शकतात.

सोबतच 21 दिवसांनंतर संक्रमितांमध्ये असामान्य लक्षणे जसे की डोळे लाल होणे, डोळ्यात संक्रमण, त्वचेसंबंधी रोग इत्यादी दिसून येतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here