FASTag काय आहे आणि त्याचा वापर कसा करतात?

286
fastag

राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना टोल नाक्यावर आपल्याला वाहनांचा टोल भरावा लागतो. आणि तो टोल भरण्यासाठी लांब लाईन मध्ये लागून भरावा लागतो.

मात्र आता सरकार ने लांब लाईन मध्ये न लागता सहजरित्या टोल नाक्यांवर टोल भरला जावा आणि यामुळे वेळेची बचत होऊन लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या साठी नॅशनल हायवेस अथोरिटी ऑफ इंडिया ने २०१४ पासूनच ही नवीन कल्पना आखली आहे. आणि आता जवळजवळ सर्वच टोल नाक्यांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या मुळे टोल नाक्यांवर येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी सुविधा होईल फक्त आपल्याला आपल्या वाहनावर फास्ट टॅग लावावा लागेल. बरेच जणांना फास्ट टॅग म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा करतात माहिती नसेल तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की फास्टटॅग म्हणजे काय आणि आपण त्याचा वापर कसा करू शकतो?

फास्टटॅग म्हणजे काय? What is FASTag

फास्ट टॅग ही अशी एक सुविधा आहे जीचा वापर करून टोल नाक्यांवर न थांबता टोल भरल्या जातो, आणि यामुळे आपल्याला टोल नाक्यांवर कोणत्याही प्रकारची रांग लावण्याची गरज नाही आहे.

फास्टटॅग वाहनांच्या समोरील काचावर लावावे लागते, आणि या लावलेल्या टॅग मध्ये रेडिओ फ्रेक्विन्सी आडेंटिफिकेशन लागलेलं असते.

आणि याचा उपयोग आपल्याला टोल नाक्यांवर होत असतो तेही कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना न करता. फास्टटॅग जवळ जवळ देशातील बऱ्याच टोल नाक्यांवर उपलब्ध झालेले आहे. आणि येत्या काही दिवसांनी हे प्रत्येक टोल नाक्यावर उपलब्ध होऊन जाईल.

फास्टटॅग कसे काम करते? How FASTag works

फास्टटॅग ला वाहनांच्या समोरच्या काचावर लावण्यात येतो, आणि या फास्ट टॅग मध्ये रेडिओ फ्रेक्विन्सी आडेंटिफिकेशन लागलेले असते.

जेव्हा आपले वाहन टोल नाक्यांवर येते तेव्हा टोल वरील लागलेले सेंसर आपल्या वाहनांवर लागलेले फास्टटॅग च्या संपर्कात येताच आपल्या फास्ट टॅग खात्यातून त्या टोल नाक्यावर लागणारा शुल्क कापण्यात येतो. कोणत्याही प्रकारचा थांबा न घेता आणि कोणत्याही प्रकारच्या रांगेत न लागता.

वाहनावर लागलेलं फास्ट टॅग आपल्या प्रीपेड खाते सक्रिय होताच आपले कार्य सुरू करते. आणि जेव्हा आपल्या फास्ट टॅग खात्यातील रक्कम संपते तेव्हा आपल्याला हे खाते रिचार्ज करावे लागते, जसे आपण आपल्या मोबाईल चे रिचार्ज करतो त्याचप्रमाणे फास्ट टॅग चे खाते सुध्दा रिचार्ज करावे लागते.

फास्ट टॅग खात्याचे रिचार्ज कसे करावे? How to Recharge FASTag Account

फास्टटॅग च्या खात्याला आपण अनेक पध्दतीने रिचार्ज करू शकतो, आपल्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेटबँकिंग द्वारा आपण फास्ट टॅग चे रिचार्ज करू शकतो.

आपल्या घरातील D2h चे किंवा मोबाईल चे रिचार्ज आपण करतो त्याचप्रमाणे फास्ट टॅग चे रिचार्ज आपण करू शकतो, फास्ट टॅग खात्यामध्ये कमीत कमी १०० रुपये ते जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंत रिचार्ज करू शकता.

आपण बँक मध्ये जाऊन सुध्दा फास्ट टॅग चे रिचार्ज करू शकता, उदा. एसबीआय बँक, अक्सिस बँक, एचडीएफसी बँक इत्यादी. त्यासाठी आपल्याला या बँकांमध्ये जाऊन आपले फास्ट टॅग खाते उघडावे लागतील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here