हे सैनिक कसले, अरे हे तर पळपुटे कार्यकर्ते आहेत : भाजपची शिवसेनेवर जोरदार टीका

248
What kind of shivsainik are these, they are runaway activists: BJP's strong criticism on Shiv Sena

मुंबई: राम मंदिर प्रकरणावरून बुधवारी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. शिवसेना भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

राम मंदिर निर्माण प्रकरणात शिवसेनेने केलेल्या टीकेमुळे हा वाद उद्भवला. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे दादरमध्ये तणाव असून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला, आता शिवभोजन थाळीची वेळ आणू नका : संजय राऊतांचा इशारा

अयोध्येत जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही शिवसेनेने केली आहे. या निषेध व्यक्त करण्यासाठी संतप्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या दादर येथील शिवसेना भवनासमोर ‘फटकार’ मोर्चा काढला होता. भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग टिवाना यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, भाजप मुंबईने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शिवसेनेवर टीका केली आहे. ‘राममंदिर उभारणीच्या धर्मकार्यात खोडा घालणार्‍या शिवसेनेला भाजप युवा मोर्चाने चांगलीच ‘फटकार’ दिलीय. त्याचा घाव इतका वर्मी लागलाय की, शिवसेनेच्या डरपोक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वर्दीआड लपून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले केले. हे सैनिक कसले…अरे हे तर पळपुटे. शिवसेनेला फटकार !’ असे या ट्टिवटमध्ये म्हटले आहे.

भाजपा युवा मोर्चाने राममंदिराच्या बांधकामाच्या आडून धर्माच्या कामात खोडा घालत आहे. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेला खर्या अर्थाने फटकारले आहे.

त्याचा घाव इतका जिव्हारी लागला की, पोलिसांच्या गणवेशात लपून बसलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला केला. हे सैनिक कसले आहेत …हे तर पळ काढणारे पळपुटे आहेत, असे म्हणत भाजपाने शिवसेनेवर प्रहार केला आहे.

शिवसेनेची गुंडगिरी ठीक नाही! : प्रवीण दरेकर

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून राज्यात गुंडगिरी, दहशतवाद आणि मारहाण करण्याचा प्रयत्न शिवसेना करीत आहे हे दुर्दैवी आहे.

खरे तर सत्तेचे कवच पुढे करून असले प्रकार महाराष्ट्रात कधी झाले नाहीत. आंबेकर नावाच्या आमच्या पदाधिका्याला मारहाण केली. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली अशी गुंडगिरी योग्य नाही, असे ते म्हणाले.

हे देखील वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here