व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

183

केंद्र सरकारने सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या वादग्रस्त आणि भडकावू मेसेजला चाप लावण्यासाठी नुकतीच नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

त्यानंतरही व्हायरल मेजेसचे प्रमाण तितकेसे कमी झालेले नाही. अजूनही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मोठ्या प्रमाणावर मेसेज व्हायरल होतात.

अशा मेसेजेसमुळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची डोकेदुखी वाढते. याच पार्श्वभूमीवर ग्रुप अ‍ॅडमिनला मोठा दिलासा देणारा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर कुणीही काहीही पोस्ट केली, वादग्रस्त मेसेज टाकले तर त्या मेसेजप्रकरणी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

संबंधित मेसेजमागे ग्रुपचा सामाईक हेतू नसेल तर अ‍ॅडमिनला दोष देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण जुलै 2016 मधील गोंदिया जिल्ह्यातील आहे. तेथील व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या 33 वर्षीय अ‍ॅडमिनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रुपमधील एका सदस्याने ग्रुपच्या महिला सदस्याविरोधात अश्लिल भाषेचा वापर केला होता. त्याप्रकरणी ग्रुप अ‍ॅडमिनलाही जबाबदार धरण्यात आले होते.

महिला सदस्याविषयी असभ्य भाषा वापरणाऱ्या सदस्यावर कारवाई न केल्याप्रकरणी ग्रुप अ‍ॅडमिनविरोधात गोंदियाच्या महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायालयाने अ‍ॅडमिनविरोधातील गुन्हा रद्द ठरवून मोठा दिलासा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here