महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट नेमकी कधी थांबणार? डाॅ.रवी गोडसे यांनी दिली महत्वाची माहिती

975
Dr.Ravi Godase

वाॅशिंग्टन : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. नवीन रुग्णसंख्या दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे, अशावेळी राज्यातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

या वातावरणात नागरिकांना दिलासा कधी मिळेल या विषयावर मुळ महाराष्ट्राचे नागरिक असलेले अमेरिकन डाॅ. रवी गोडसे यांनी लाईव्हद्वारे माहिती दिली आहे.

डाॅ. रवी गोडसे म्हणाले, नागरिकांनी सकारात्मक राहायला हवे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही जर करोनाची बाधा झाली तर घाबरण्याचे काही कारण नाही.

कारण होणारा त्रास हा इतर व्यक्तिंपेक्षा नक्कीच कमी होतो. त्यामुळे केंद्र सरकारने जास्तीत जास्त लसीकरणावर भर द्यायला हवा.

महाराष्ट्रात जास्त रुग्णसंख्या वाढते आहे त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवावी. सर्वांचे लसीकरण करणे आणि जे कोरोना रुग्ण आहेत.

त्यांना सर्व पणाला लावून वाचवणे या दोन गोष्टींवर भर दिल्यास नक्कीच लवकरच महाराष्ट्रातील दुसरी लाट संपूष्टात येईल, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी करोनाची भिती न बाळगता उपचार सुरु ठेवले पाहिजे. भीतीमुळे मन कमजोर होते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.

कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना करोना झाला तरी मृत्यू होत नाही. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंगबरोबरच जास्तीत जास्त लसीकरण व्हावे, असेही डाॅ. गोडसे म्हणाले.

अमेरिकेत सध्या तिसरी लाट सुरु आहे. दुसऱ्या लाटेत दररोज तीन ते चार हजार जणांचा करोनाने मृत्यू होत होता.

मात्र योग्य नियोजन आणि जास्तीत जास्त लसीकरण मोहिम राबवून दुसरी लाट संपूष्टात आणली.

दरम्यान, राज्यात शनिवारी (दि. 17 एप्रिल) राज्यात 67123 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 56783 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

एकूण 3061174 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 647933 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.18% झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here