परळीच्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील ‘तो’ मंत्री कोण?

238

पुणे : पुण्यात शिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय तरुणीने रविवारी पुण्यातील महम्मदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

त्या आत्महत्येस महाविकास आघाडी सरकारमधील विदर्भातील एका मंत्र्याचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व प्रकरणात भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.

या आत्महत्या प्रकरणातील मंत्र्याला महाविकास आघाडी सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा मंत्री शिवसेनेचा असल्याची चर्चा आहे.

पुणे पोलिसांनी या प्रकरणातील सत्य बाहेर आणले पाहिजे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ‘राठोड’गिरी सहन करणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे त्याचबरोबर अशा मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण ही पुण्यात शिक्षण घेत होती, त्या दरम्यान तिचे विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध झाले.

त्या प्रकरणातून तीने आत्महत्या केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान या सर्व प्रकरणात शिवसेनेकडून अद्याप काहीही प्रत्युत्तर किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here