बॉलिवूडला धर्मासाठी ‘अलविदा’ केलेल्या सना खानचा मौलवी पती आहे तरी कोण?

211

एजाज खानने अभिनेत्री सना आणि पती अनस सईदची भेट घडवून आणली, अखेर दोघे विवाह बंधनात अडकले.

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर सना खान (sana khan) हिने गुजरातमधील मौलवी मुफ्ती अनस सईद (anas sayed) यांच्याशी गुपचुप निकाह केल्याचे समोर आले आहे.

जय हो चित्रपट फेम सना खानचा पती अनस सईद गुजरातमधील सुरत येथील राहणार आहे. हा एक धार्मिक नेता असून (इस्लामिक स्कॉलर) आहे. तसेच त्याचा बिझनेसदेखील आहे.

‘बिग बॉस 7’ (Big Boss) फेम एजाज खानने अभिनेत्री सना आणि पती अनस सईदची भेट घडवून आणली. भेटीनंतर दोघांमधील जवळीक वाढु लागली आणि अखेर दोघे विवाह बंधनात अडकले.

लग्नानंतर सनाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तिने ग्रीन आणि गोल्डन रंगचा लेहंगा परिधान केला आहे तर अनसने गोल्डन शेरवानी परिधान केली आहे.

तिने या निकाहाचे  फोटो इन्सटाग्राम अकाउंटवरुन शेअर करत माहिती निकाह केल्याची माहिती दिली. यासोबत तिने आपण मौलवीशी लग्न केल्याने आता एक सुखी संसार करणार असून बॉलिवूड सोडल्याचे जाहीर केले होते.

यानंतर बॉलीवूड मध्ये चर्चा रंगली ती मौलवी मुफ्ती अनस सईदची. निकाहाचे फोटो पाहिल्यानंतर हा मौलवी कोण आहे? असा प्रश्न तिच्या चाहत्यावर्गातुन उपस्थित होऊ लागला.

यापूर्वी सनाने व्हाइट आउटफिट मधील फोटो शेअर करत मी कधी विचारदेखील केला नव्हता की हलाल प्रेम इतके सुंदर होईल. अशी भावना व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here