‘पंकजा, तुम्ही जास्त बोलता’ असे मोदी का म्हणाले? नरेंद्र मोदी आणि पंकजा मुंडे भेटीत नेमके काय घडले? जाणून घ्या!

1605

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीत भाजप नेत्यांची चांगलीचं हजेरी घेतल्याची माहिती समोर येत आहे.

मंत्रीपदाची ‘अपेक्षा’ असलेल्या नेत्यांचीही मोदींनी बऱ्याच कानपिचक्या दिल्या आहेत.

”सध्या अनेकांना मंत्री बनण्याची घाई झाली आहे. परंतु आत्ता लोकसेवा करण्याची वेळ आहे. मंत्रीपद मागण्याची नाही,” असा अप्रत्यक्षपणे टोमणा लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजा मुंडे उपस्थितीत असलेल्या बैठकीत अनेकांना कधी थेट तर कधी आडवळणाने एकनिष्ठ रहा असा सल्ला देताना पक्षापेक्षा मोठा कोणी नसल्याचा संदेश दिल्याचे समोर आले आहे.

मंत्रीपद मिळाले नसल्याने नाराज असलेल्या नेत्यांना मोदींनी चांगलेचं ‘कानमंत्र’ दिल्याची चर्चा रंगलीय.

प्रीतम मुंडे यांना केंद्रात स्थान मिळाले नसल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान योगायोगाने भाजपच्या ११ राष्ट्रीय सचिवांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत मोदींनी या महत्त्वाकांक्षी नेत्यांना बऱ्याच कानपिचक्या दिल्या आहेत. या बैठकीला अध्यक्ष जे.पी.नड्डा, बी. एल.संतोष, पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर, सुनिल देवधर उपस्थित होते.

संयम ठेवा अन्यथा …

”राजकारणात संयम ठेवला नाही, तर कितीही मोठा नेता असला तरी त्याचे राजकारण संपुष्टात येते,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित नेत्यांची कानउघाडणी केली आहे.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट रोख पंकजा मुंडे यांच्याकडेच असल्याची चर्चा बैठकीनंतर दिल्ली व राज्यातील नेत्यांत सुरू झाली आहे.

राजकारणात संयम किती महत्त्वाचा आहे, हे उदाहरण देताना पंतप्रधान मोदींनी तीन नावांचा उल्लेख केला आहे.

पहिले म्हणजे शंकरसिंग वाघेला, दुसरे मदनलाल खुराणा आणि तिसरे कल्याण सिंग. या तिघेही राजकीय आखाड्यात कसलेले होते. दूरदृष्टी होती, लोकनेते होते.

या तिघांना राजकिय समज होती, परंतु फक्त संयम सुटला त्यामुळे तिघांचेही राजकारण संपल्याचे मोदी म्हणाले. मंत्रीपदाला नव्हे तर लोकसेवेला प्राधान्य द्या, असा सल्लाही मोदींनी दिला आहे.

पंकजा, तुम्ही खूप बोलता !

एकूण ११ राष्ट्रीय सचिवांचा सोशल मीडिया रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या हातात घेऊन बसले होते.

एकूण २५ राष्ट्रीय मुद्दे निवडण्यात आले होते. त्यावर कोणकोणते नेते ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्रामवर व्यक्त झाले आहेत. याची ‘पॉईंट टू पॉईंट’ माहिती मोदींकडे होती. त्यामुळे सर्वांची भंबेरी उडाली होती.

पंकजा मुंडे यांचा नंबर आल्यावर, ”पंकजा तुम्ही जास्त बोलता.. ‘लोकल’ मुद्द्यावर पण खूप बोलता. पण राष्ट्रीय मुद्द्यावर तुम्ही बोलताना दिसत नाही.

राष्ट्रीय मुद्द्यावर तुमचे ट्विट कमी आहेत. लोकल पेक्षा राष्ट्रीय मुद्द्याकडे जास्त लक्ष द्या,” असा सल्ला मोदीजींनी दिला.

परंतु, हे सांगताना मोदीजींनी ‘तुम्ही खूप बोलता’ या शब्दावर जोर दिला. त्यामुळे सर्वांनाच त्याचा अर्थ कळाला आणि नव्या चर्चेला उधाण आले आहे.

बीड जिल्ह्यात एक मुस्लिम व्यक्तीने गोशाळा बांधली आहे. तो दीडशे गायींचा सांभाळ करतो. त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री दिला आहे.

या पद्मश्रींना जाऊन तुम्ही भेटला आहात का, असा सवालही मोदींनी पंकजा मुंडे यांच्यासमोर उपस्थित केला.

त्यावर पंकजा मुंडे काहीच बोलल्या नाहीत. त्यावर लोकांशी नाळ तोडू नका. राष्ट्रीय प्रश्नांची व लोकल समस्यांची एकत्रित जोड घालू नका.

सोशल मीडियावर व लोकांच्या कामात सक्रिय रहा, पण संयम पाळा.

पक्षाला सर्व सारखे असतात व सर्वांना संधी देताना त्यांच्या कामाकडे बारीक लक्ष असते.

तेव्हा नेत्यांनी समाजासमोर पक्षाची प्रतिमा मलिन करून नुकसान करू नये, असा सल्लाही मोदींनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here