प्रजासत्ताक दिन का रद्द करू नये? काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा सल्ला

167

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा प्रजसत्ताक दिनाचा दौरा रद्द झाला आहे.

याचा हवाला देत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी प्रजासत्ताक दिन का रद्द करण्यात येऊ नये असा सल्ला दिला आहे.

थरूर यांनी ट्विट करून म्हटले आहे आहे की, ‘ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा कोरोनामुळे भारत दौरा रद्द झाला आहे.

सध्या प्रजासत्ताक दिनासाठी आपल्याकडे प्रमुख पाहुणे नाही. अशावेळी आपण हा सोहळा का रद्द करु नये?

तसेच परेडसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना बोलवणे बेजबाबदारपणा असेल, असेही थरूर म्हणाले आहेत.

इंग्लंडचे पंतप्रधान जॉन बोरिसन यांना भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

परंतु ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळल्याने बोरिस यांनी आपला रद्द केला.

तसेच बोरिस यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन करून दौरा रद्द केल्याबद्दल खेदही व्यक्त केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here