पत्नीने पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले | पत्नी व नातेवाईकांची प्रेयसीला बेदम मारहाण !

962

नागदा येथे राहणार्‍या पतीला पत्नीने घरात तिच्या मैत्रिणीसह पकडले. पत्नी तिच्या नातेवाईकांसोबत घरात पोहोचली, जिथे पती आपल्या मैत्रिणीसमवेत होता.

उज्जैन : पती पत्नीचे नाते विश्वासवर टिकून असते. मात्र काही घटनांमूळे या नात्याला तडा जातो. जेव्हा पती पत्नीच्या नात्यात तिसरी व्यक्ती येते तेव्हा नात्यात गुंता होणे निश्चित असते.

उज्जैनपासून सुमारे 50 किमी अंतरावर पती-पत्नीचा हाय व्होल्टेज फॅमिली ड्रामा घडला आहे. संपूर्ण परिसरात या ड्राम्याची चर्चा सुरु होती. फॅमिली ड्रामा रंगला कारण पत्नीने तिच्या नवऱ्याला मैत्रिणीसह रंगेहाथ पकडले.

त्यानंतर पत्नीने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी पकडण्यापूर्वी पत्नीने दोघांना नातेवाईकांच्या मदतीने मनसोक्त मारहाण केली. यात नातेवाईकांनी देखील पत्नीलाही साथ दिली.

आपल्या पतीचे आपल्या मैत्रिणीशी संबंध असल्याची कुणकुण पत्नीला लागली होती. त्यानंतर तिने त्याच्यावर पाळत ठेवून त्याला रंगेहात पकडले.

नागदा येथे राहणार्‍या पतीला पत्नीने घरात तिच्या मैत्रिणीसह पकडले. पत्नी तिच्या बहिणीसमवेत घरात पोहोचली. तेव्हा तिचा पती मैत्रिणीसमवेत घरात होता.

जेव्हा पत्नी तिथे पोहचली तेव्हा घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. तेव्हा पत्नीने घटना पोलिसांना सांगून बिरलाग्रामच्या पोलिसांना बोलावून घेतले.

नवऱ्याला केली मारहाण

ही माहिती मिळताच एसएचओने एसआय योगिता उपाध्याय यांना पोलीस पथकासह घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी घराचे कुलूप तोडले.

त्यानंतर पोलिसांनी पती आणि त्याच्या प्रेयसीला या दोघांनाही बाहेर काढले, त्याच वेळी पत्नीने तिच्या नवऱ्याला  मारहाण केली.

नवरा व तिच्या मैत्रिणीलाही मारहाण केली. पतीला नेल्यानंतर पोलिसांनी मैत्रिणीलाही बाहेर आणले. पत्नी आणि तिच्या कुटुंबियांनी प्रेयसीला बेदम मारहाण केली

पत्नीचा आरोप, दोघेही पूर्वी पकडले गेले

नागदा येथील बिरलाग्राम भागात राहणार्‍या पत्नीने सांगितले की, माझा नवरा ग्रासिममध्ये काम करतो. कर्तव्यावर असल्याचा आव आणून दुपारी 2 वाजता तो घराबाहेर पडला होता.

त्याच्यावर पाळत ठेवून पाठलाग केला तेव्हा पाहिले की, कारखान्यात पोहोचण्यापूर्वी त्याला आपल्या मैत्रिणीच्या मित्राच्या घरी घेऊन गेला.

तेव्हा त्याच्या मित्राने दोघांना खोलीत सोडून बाहेरुन कुलूप लावले आणि नवऱ्याचा मित्र तेथून निघून गेला.

त्यानंतर बायकोने नातेवाईकांना व पोलिसांना बोलावून घेऊन भरपूर तमाशा केला.आपला पती प्रेयसीच्या सांगण्यावरून बेदम मारहाण करतो, असा पत्नीचा आरोप आहे.

गुन्हा दाखल नाही

बिरला  गाव पोलीस ठाण्याचे प्रभारी हेमंत जादौन यांनी सांगितले की, अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदलेला नाही. या प्रकरणाचा तपास केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here