पत्नीने वांग्याची भाजी केली नाही, पतीने दारूच्या नशेत पत्नीला पेटवून दिले !

306
CRIME news

उदगीर : तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून दारूच्या नशेत क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

पीडित मुलीवर उदगीर येथे उपचार सुरू आहेत. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर तालुक्यातील हेर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कौटुंबिक वादामुळे महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

फरजाना शादुल शेख असे पीडितेचे नाव आहे. ही महिला पती शादुल शेख यांच्या त्रासाला कंटाळली होती. त्याला दारूचे व्यसन जडल्याने सतत वादावादी व मारहाण करीत होता.

काल देखील पत्नीशी वाद घालून तो सकाळी बाहेर गेला होता. रात्री घरी आल्यावर त्याने नशेत असताना फरजानाला मारहाण करण्यास सुरवात केली.

तिने वांग्याची भाजी का केली नाही असे विचारत त्याने तिला मारहाण केली. त्याने फरजानाला घरात रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्नही केला.

या घटनेत फरजाना गंभीर जखमी झाली. फरजानावर उदगीर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फरजानाच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भांडणात शेजार्‍यांच्या मध्यस्थीमुळे फरजानाचे प्राण वाचले आहेत.

फरजानाचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले. मात्र, दारूच्या व्यसनामुळे शादुल कोणतेही काम करत नव्हता. विशेष म्हणजे त्याचे विवाहबाह्य संबंध होते. हे उघड होताच फरजाना आणि त्याचा सतत वाद होत होते.

लहान-सहान कारणावरून शादुल तिला सतत त्रास देत होता. त्याने वांग्याची भाजी का केली नाही, या क्षुल्लक कारणावरून शनिवारी मारहाण केली.

त्याने रागाच्या भरात फरजानाच्या अंगावर फेकून स्टोव्हजवळील रॉकेलच्या डब्यातील रॉकेल तिच्या अंगावर ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला.

दोघांचे भांडण व फरजानाचे किंकाळणे ऐकून शेजारी मदतीसाठी धावून आले. त्यांनी पेटलेल्या फरजानाला वाचविले. पुढील उपचारासाठी तिला तातडीने उदगीर येथे हलविण्यात आले. त्यामुळे तिचा जीव वाचला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या : 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here