अनैतिक संबंधांत पतीचा अडथळा | प्रियकराला सोबत घेऊन पत्नीनं केला पतीचा खून

215

खानापूर : जांबोटी (ता. खानापूर) येथील फोटोग्राफर विजय चंद्रकांत अवलक्की (वय 52) यांचा खून अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याच्या कारणाने खून झाला.

विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघडकीस आली आहे.

या प्रकरणातील शेवटची संशयित सोबदा विजय अवलक्की (वय 44) हिला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

यापूर्वी दोघा प्रमुख संशयितांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात सहभाग घेतलेल्या तीन अल्पवयीन तरुणांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

दि. 25 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता विजय अवलक्की यांचा त्यांच्याच दुकानात कामाला असलेल्या रामचंद्र कांबळे याने मित्रांच्या साहाय्याने निर्घृणपणे खून केल्याचे उघडकीस आले होते.

दोन महिन्याचा थकीत पगार न दिल्याच्या रागातून खून केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. पण या खून प्रकरणाला थकीत पगार हे एकमेव कारण नसावे या निष्कर्षापर्यंत पोलिस अधिकारी आले होते.

या खून प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार कारणीभूत असल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू होती. या माहितीवरून पोलिसांनी रामचंद्र कांबळे व अवलक्की यांची पत्नी सोबदा हिचे मोबाईल संभाषण तपासले.

यावरून त्यांच्यामध्ये अनेक दिवसापासून अनैतिक संबंध सुरू होते. याची कुणकुण विजय यांना लागली होती. त्यांनी रामचंद्र याला कामावरून काढून टाकले.

तसेच पत्नीलाही दम देऊन वागणूक सुधारण्याचा सल्ला होता. अनैतिक संबंधांना पती विजय यांचा होत असलेला विरोध सहन न झाल्याने त्यांचा काटा काढण्यात आला.

मंडल पोलिस निरीक्षक सुरेश शिंगी, उपनिरीक्षक बसगौडा पाटील आणि गुन्हे विभागाचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी या प्रकरणाचा तपास लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here