लग्नाच्या वाढदिवसादिवशीचं ब्यूटी पार्लरला जाण्याच्या बहाण्याने पत्नी पळून गेली !

415

जयपूर : लग्नाला एक वर्ष झाले आहे आणि लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशीच पत्नी ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडली.

मात्र, ती बराच वेळ परतली नाही. म्हणून नवरा तिचा शोध घेऊ लागला. पण जेव्हा ती भेटली नाही. तेव्हा त्याला समजले की त्याची पत्नी पळून गेली आहे.

काही वेळातच तो आग्रा येथे तिच्या माहेरी पोहोचला. तथापि, माहेरच्या लोकांनी त्याला घरांत येऊ दिले नाही, तेव्हा तो तिच्या घरापुढे जवळपास तीन दिवस बसून राहिला.

ही घटना राजस्थानची आहे. राजस्थानमधील अजमेर येथील अविनाश वर्माचे एक वर्षापूर्वी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सुलहकुल नगर येथील एका युवतीशी लग्न झाले होते.

धक्कादायक : प्राथमिक आरोग्य केंद्रात लाखो रुपयांची औषधी उघड्यावर जाळून टाकली !

अविनाश लेखापाल असून त्यांचे वडील निवृत्त नायब तहसीलदार आहेत. मात्र चांगली नोकरी असूनही पत्नीने अविनाश हुंड्यासाठी छळ करीत असल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली.

हा खटला अजमेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. काही दिवसांनी अजमेर पोलिस अविनाशच्या घरी पोहोचले व समज देऊन कारवाई केली होती.

Big Decision of State Gvernment | आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच भरती व्हावे लागणार!

या घटनेनंतर अविनाशच्या आई-वडिलांनी त्याला संपत्तीतून काढून टाकले. एवढेच नव्हे तर त्याने नोकरीही गमावली. कालांतराने त्याची पत्नी त्यांच्याशी फोनवर बोलू लागली, परंतु ती नांदायला तयार नव्हती. गेल्या शनिवारी अविनाश पुन्हा पत्नीला भेटायला गेला होता.

मात्र, अविनाश तिच्या माहेरी येताच त्यांची पत्नी तिच्या नातेवाईकांच्या घरी निघून गेली. मात्र, अविनाशही तिच्या घराबाहेर बसला. अविनाशला या अवस्थेत पाहून शेजाऱ्यांनी त्याच्यावर दया दाखवत अविनाशची जेवायची व झोपायची व्यवस्था केली.

अविनाश बराच वेळ आपल्या पत्नीच्या घराबाहेर बसून राहिला पण शेवटपर्यंत ती त्याला भेटली नाही, त्यामुळे अविनाश रिकाम्या हाताने घरी परतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here