मोदी सरकार ‘फिर एक बार’ सामान्यांच्या खिशात पुन्हा हात घालणार ?

269
Naredra Modi

नवी दिल्ली : देशातील काही भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन लागू आहे. तर काही भागांत लॉकडाऊनसदृश्य परिस्थिती आहे.

कोरोना संकटामुळे देशातील सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार संकटात आला आहे. अशा परिस्थितीत आता महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

कारण लवकरच पेट्रोल, डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price Hike) वाढू शकतात तसे झाल्यास वाहतूक खर्च जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतील. याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसेल.

एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर इंधन कंपन्या दर वाढवणार असल्याचं वृत्त सुत्रांच्या हवाल्याने एएनआयनं दिले आहे.

देशातील ५ राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. पैकी ४ राज्यांमधील मतदान पार पडलं आहे. तर केवळ पश्चिम बंगालमधील दोन टप्प्यांमधील मतदान शिल्लक आहे.

२९ एप्रिलला शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. त्यानंतर इंधन कंपन्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेलच्या किमती २ ते ३ रुपयांनी वाढू शकतात. मात्र ही वाढ एकदाच होणार नाहीत. ती हळूहळू होईल.

गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारपेठेत इंधनाची मागणी घसरली आहे. सध्या खनिज तेलाच्या एका बॅरलची किंमत ६६ डॉलर इतकी आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये २७ फेब्रुवारीपासून वाढ झालेली नाही. त्यानंतर मार्च, एप्रिल महिन्यात इंधनाच्या दरात चारवेळा कपात झाली.

त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचे दर ७७ पैशांनी, तर डिझेलचे दर ७४ पैशांनी कमी झाले. दिल्लीत आज पेट्रोलचा दर ९०.४० रुपये, तर डिझेलचा दर ८०.७३ रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ९६.८३ रुपये, तर डिझेलचा दर ८७.८१ रुपये इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here