बीड: बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसर्या पत्नीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, लवकरच ते पुस्तक स्वरूपात आपल्या प्रेमाविषयी माहिती प्रकाशित करतील. त्यामुळे पुन्हा एकदा या नात्याबद्दल व प्रकरणाबद्दल बरीच चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी जेव्हा धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने जेव्हा अत्याचाराचा आरोप केला होता. तेव्हा धनंजय मुंडे यांनी स्वत: सोशल मिडीयावर जाहीरपणे सांगितले कि, संबंधित महिलेच्या बहिणीशी त्यांचे प्रेमसंबंध होते. या महिलेपासून दोन मुले आहेत.
करुणा धनंजय मुंडे असे या महिलेचे नाव असल्याची माहिती मिळाली. धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणाच्या बहिणीने आपली तक्रार मागे घेतल्यानंतर ही सर्व प्रकरणे थांबली आहेत असे वाटत असतानाच करुणा यांनी पुन्हा ते पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या पुस्तकात नक्की काय काय गौप्यस्फोट होतात याकडे राज्यातील जनेतेचे लक्ष लागले आहे.
करुणा धनंजय मुंडे नावाच्या फेसबुक अकाऊंटवरील पेजवरुन त्यांच्या लव्ह स्टोरीचे रहस्य समोर येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासोबत एक फोटो देखील जोडला गेला आहे.
वाद कधी सुरू झाला?
सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. मुलीने मुंडेंविरूद्ध ओशिवरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये याबाबत स्पष्टीकरण दिले होते. रेणूची बहीण करुणाशी संबंध असल्यामुळे त्यांना दोन मुले असल्याचे खुद्द धनंजय मुंडे यांनी उघड केले होते.
रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्यावर काय आरोप केले?
रेणू शर्मा यांनी ट्विटरवर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. त्याच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत मुंडे यांनी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली. शर्मा यांनी बलात्कार आणि शारीरिक शोषणाचा आरोपही केला होता. आता या पुस्तकात नेमके काय दडले आहे याची उत्सुकता सर्वाना आहे.