लातूर जिल्हयात वादळी वारा,पावसाचे संकेत | नागरिकांनी काळजी घ्यावी

408

लातूर : जिल्हयात दि. 20 ते 22 मार्च या कालावधीत वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहे.

नैसर्गिक आपत्तीचे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवून दर तासांनी पडणाऱ्या पावसाबाबत तसेच काही हानी झाल्यास त्याबाबत संदेश या कार्यालयास दयावे, असे निर्देश अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी दिले आहेत.

या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व शेतकरी, नागरिकांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे.

शेतकऱ्यांनी दुपारी 3 ते 7 या वेळेत शेतीची व इतर कामे करु नये कारण सदर कालावधीतमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते.

दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत.

आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा व पाऊस सुरु असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या सर्व सूचना आपल्या अधिनस्त पोलीस अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, कृषि सहाय्यक यांच्याव्दारे आपल्या तालुक्यातील गावांना सावधगिरीची सूचना द्यावी.

सदरच्या कालावधीत कोणीही आपले मुख्यालय सोडू नये व नागरिकांनी काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे विजयकुमार ढगे यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here