पोलिसाच्या अत्याचाराला कंटाळून महिलेची नदीत उडी घेऊन आत्महत्या

180
Sucide

जयपूर : पोलिसांनी केलेल्या अत्याचाराच्या घटनांचा पाढा काही संपत नाही. देशाच्या विविध भागात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे संताप व्यक्त केला जातोय.

पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची घटनामराजस्थानातील केसरी सिंहपूर परिसरात घडली आहे. या घटनेनंतर संबंधित पोलिस शिपायी फरार झाला आहे.

पोलिस शिपायाकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून महिलेने नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मृत महिलेने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ तयार केला होता. यात तिने पोलिस शिपाई मनीराम चौहान याने ब्लॅकमेल करत माझ्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

याच्या असह्य त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. महिला तिन मुलांची आई होती. घटनेनंतर आरोपी मनीराम चौहान फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून मटीली पोलीस ठाण्याचे पोलिस शिपाई मनीराम चौहानवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआरमध्ये पतीने म्हटले की, चौहान आणि त्यांची पत्नीमध्ये वाद सुरु होता. यावरून ती तणावात होती. त्यामुळेच तिने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी तयार केला व्हिडीओ

मृत महिलेने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ तयार केला होता. ‘मी आज माझे आयुष्य संपवत आहे. मम्मी, पप्पा, भैया, भाभी मला माफ करा मी आज तुम्हाला सोडून जात आहे. मी माझ्या आयुष्याला कंटाळले आहे. मरण्याचे कारण शिपाई मनीराम आणि त्याची पत्नी दोन्ही आहेत.

फक्त आणि फक्त त्याच्यामुळेच मी आत्महत्या करत आहे. त्याने माझ्यावर वारंवार बलात्कार केलाय. ब्लॅकमेल केलेय, असे त्या व्हिडीओत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here