पतीच्या बाजूला झोपलेल्या महिलेवर बलात्कार, समोर आले धक्कादायक ‘कारण’

1331
kidnap

महिलेने आरोपीला (Criminal) आपला पतीच (Husband) समजले आणि तिला जेव्हा या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा भयंकर घटना समोर आली!

भोपाळ : आपल्या समाजात अनेकदा बलात्काराच्या भयंकर घटना घडत असतात. काही घटना एवढ्या विचित्र असतात की, आपण घटना ऐकून चक्रावून जातो.

बलात्काराची (Rape) अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेत बलात्कार झाला त्यावेळी महिलेचा पती तिच्या शेजारीच झोपला होता. त्याच खोलीत मुलंही बाजूलाचं झोपलेली होती.

मात्र, महिलेने आरोपीला आपला पतीच असल्याचे समजले. जेव्हा तिला या गोष्टीची जाणीव झाली की, हा आपला पती नसून कोणीतरी दुसराच व्यक्ती आहे, तेव्हा ती मोठ्याने ओरडाओरडा करू लागली.

महिलेचा आवाज ऐकून पती झोपेतून उठला. तेव्हा त्याने आरोपीला पडकण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आरोपी (Criminal) फरार झाला. ही घटना मध्य प्रदेशच्या (Crime in Madhya Pradesh) रीवा येथील आहे.

हे प्रकरण मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील मऊगंज येथील आहे. महिला आपला पती आणि दोन मुलांसोबत एका खोलीत झोपली होती. रात्रीच्या अंधारात एक अज्ञात व्यक्ती तिच्या खोलीत शिरली, या व्यक्तीने पिडीत महिलेवर बलात्कार केला.

सुरुवातीला महिलेला वाटले की हा आपला पतीच आहे. मात्र तिला काही वेळातच याची जाणीव होऊ लागली की हा दुसराच कोणीतरी आहे. यानंतर महिलेने मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. महिलेचा आवाज ऐकून तिचा पती झोपेतून जागा झाला.

महिलेने ओरडायला सुरुवात करताच आरोपी सावध झाला. महिलेच्या पतीने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना धक्का देत आरोपी घटनास्थळाहून पळून गेला. पतीने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला. मात्र रात्रीच्या अंधरात आरोपी पळून जाण्याचा यशस्वी झाला, अद्याप त्याचा तपास लागला नाही.

घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित महिला आपल्या पतीसह पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने पोलिसांना आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. महिलेने सांगितले, की रात्री खोलीचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे, हा व्यक्ती सहजरित्या घरात येऊ शकला.

महिलेची तक्रार गांभीर्यानं घेत मऊगंज एएसपी विजय डाबर यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास महिला अधिकाऱ्याकडे सोपवला गेला आहे. विजय डाबर यांनी सांगितले, की प्रकरणाचा तपास सुरू आहे. महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here