अहमदाबाद : राजस्थानमधील चितौडगढ जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून शेजारी राहणाऱ्या महिलेने आणि तिच्या मुलाने महिलेला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केली.
यात ती गंभीर जखमी झाली आहे. डुंगला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. आरोपी आणि पीडिता हे शेजारीच राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला होता, त्यानंतर ही घटना घडली.
आरोपींनी महिलेला निर्वस्त्र केले. त्यानंतर तिच्या पायांवर आणि गुप्तांगावर लाथा मारल्या. यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्या उजव्या हाताची दोन बोटे मोडली आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २८ जानेवारी रोजी कुपनलिकेवर ४५ वर्षीय महिला कपडे धूत होती.
त्याचवेळी आरोपी चंदी बाई आणि तिचा मुलगा किशन तेली हे दोघे मोटरसायकलवरून आले. चंदीबाईने तिच्याशी वाद घाला. तिने महिलेला पकडून ठेवले.
त्यानंतर मुलाला मारहाण करण्यास सांगितले. दोघांनी तिला निर्वस्त्र केले. मोटरसायकलच्या साखळीने तिला मारहाण केली. महिलेने मदतीसाठी धावा केला. मात्र, कुणीही पुढे आले नाही.
या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.